
“आमची लढाई दहशतवादाविरुद्ध आहे. म्हणून 7 मे रोजी आम्ही दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. दुर्देवाने पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांची साथ दिली. त्यांनी दहशतवाद्यांच्या लढाईला आपली लढाई बनवलं. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई आवश्यक होती. त्यामुळे त्यांचं जे नुकसान झालं, त्याला पाकिस्तानी सैन्य जबाबदार आहे. आमच्या एअर डिफेन्स सिस्टिमला भेदण अशक्य होतं” असं एअर मार्शल एके भारती यांनी सांगितलं. DGMO ने आजही पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानची पोलखोल केली. या पत्रकार परिषदेला एअर फोर्स, लष्कर आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.
“पाकिस्तानने सातत्याने हवाई हल्ले केले. पण भारतीय सैन्यदलांनी नागरिक आणि लष्करी नुकसान कमीत कमी होईल हे सुनिश्चित केलं. भारतीय सैन्य दलांकडे अनेक थरांची एअर डिफेन्स सिस्टिम आहे. यात लष्कर, नौदल आणि एअर फोर्सची सिस्टिम आहे” असं एके भारती यांनी सांगितलं.
एअर फोर्सने काय सांगितलं?
“भारताकडे अनेक थरांची एक मजबूत एअर डिफेन्स सिस्टिम आहे. खालच्या थराची एअर डिफेन्स सिस्टिम, शोल्डर गन, शॉर्ट रेंज जमिनीवरुन हवेत मारा करणारी, लॉन्ग रेंज क्षेपणास्त्र आमच्या ताफ्यात आहेत” असं एके भारती यांनी सांगितलं. “पाकिस्तानचा ड्रोन्स, क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमानाद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला” असं एके भारती यांनी सांगितलं.
चिनी क्षेपणास्त्राचे अवशेष
“पिचोरा, एएलडी गन्स या जुन्या सिस्टिमसह स्वदेशी बनवाटची आकाश सिस्टिम यांनी उत्तम परफॉर्म केलं. मागच्या आठवड्यात आम्ही या सिस्टिमद्वापरे यश मिळवलं” अशी एअर फोर्सने माहिती दिली. या पत्रकार परिषदेत चिनी मालाची भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने काय हालत केली, त्याचे पुरावे दिले. “चीनच्या PL-15 मिसाइलने टार्गेट मिस केलं, त्याचे अवशेष दाखवले. लॉन्ग रेंज रॉकेट, मानवरहीत विमान पाडली” एअर फोर्सने फोटोसह हे सर्व पुरावे दाखवलं.