
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सिलीगुडीतील बागडोग्रा येथील गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिलीगुडी उपविभागातील विधाननगर भागात पोहोचल्या होत्या. याठिकाणी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला आयोजकांनी विधाननगरमध्ये परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर चार वेळा स्थळ बदलण्यात आले. यावरून राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गोसाईपूर येथे पार पडलेली आंतरराष्ट्रीय संथाल परिषद याआधी विधाननगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने बागडोगरा विमानतळाजवळील गोंसाईपूरमध्ये बैठक आयोजित करण्याची परवानगी दिली होती. यानंतर राष्ट्रपती विधाननगर मध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘प्रशासनाच्या मनात काय होते हे मला माहित नाही; त्यांनी मला येथे आणले नाही. मी त्यांना सांगितले की मला कोणतीही समस्या दिसत नाही. मी बंगालची मुलगी आहे, तरीही मला इथे येऊ दिले जात नाही. ममता माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे; मला माहित नाही, कदाचित ती माझ्यावर रागावली असेल.’
यावर बोलताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, ‘दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलेल्या चिंता या प्रशासनाच्या संवेदनशीलतेतील आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाबद्दलच्या आदरातील अत्यंत दुर्दैवी त्रुटी दर्शवतात. राष्ट्रपतींनाच व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करावी लागते, ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनावर आणि तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते.’
The concerns expressed by Hon’ble President Droupadi Murmu ji @rashtrapatibhvn during her visit to Darjeeling reflect a deeply unfortunate lapse in administrative sensitivity and respect for the highest constitutional office of the country. When the President herself is compelled… https://t.co/GbbIRZjPsd
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) March 7, 2026
पश्चिम बंगाल सरकारने अशी परिस्थिती कशी निर्माण झाली याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. राष्ट्रपती पदाबद्दलचा अनादर किंवा निष्काळजीपणा हा देशाच्या प्रतिष्ठेलाच धक्का देणारा आहे. घटनात्मक पदांची पवित्रता राजकारणापेक्षा नेहमीच वर असली पाहिजे. आदिवासी समाजाचा सन्मान करण्यासाठी असलेल्या प्रसंगी संवेदनशीलता, आदर आणि योग्य समन्वय दिसायला हवा. माननीय राष्ट्रपतींना निराशा व्यक्त करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये.