धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय… फोन आला आणि दीपकेंचा दोन हात उंचावत मोठा जल्लोष

ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं, ज्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, हमारे सरकार में इस्तीफे होते नही... असं म्हणत मुक्ताफळे उधळली गेली, त्या भाजप सरकारला अखेर तरुणांसमोर गुडघे टेकावे लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांना मंत्रिमंडळातून जावंच लागलं. जनशक्तीचा रेटाच मोठा होता.

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय... फोन आला आणि दीपकेंचा दोन हात उंचावत मोठा जल्लोष
abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 3:16 PM

ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं, ज्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, हमारे सरकार में इस्तीफे होते नही… असं म्हणत मुक्ताफळे उधळली गेली, त्या भाजप सरकारला अखेर तरुणांसमोर गुडघे टेकावे लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांना मंत्रिमंडळातून जावंच लागलं. जनशक्तीचा रेटाच मोठा होता. या आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दीपके यांना फोन आला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं समोरून सांगण्यात आलं. हा शब्द ऐकताच दीपकेंनी एकच जल्लोष केला. दोन हात उंचावत दीपकेंनी आनंद साजरा केला. जल्लोष केला. दीपकेंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिजीत दीपके आंदोलन स्थळी असतानाच त्यांचा मोबाईल वाजला. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचं त्यांना सांगण्यात आलं. हे शब्द ऐकताच दीपकेंना आनंदाश्रू आवरणं कठिण झालं. दीपकेंनी हातवर उंचावून एकच जल्लोष केला. त्याचबरोबर समोर जमलेल्या हजारो जनसमुदायानेही जोरदार जल्लोष केला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हाताला सलाईनचं इंजेक्शन लावलेलं असतानाही अभिजीतने जोरजोरात घोषणा दिल्या.

 

झुकती है दुनिया…

आपल्या तरुण मित्रांशी हात उंचावून त्याने जल्लोष केला. दीपकेनी वज्रमूठ उंचावताच एकच जल्लोष झाला. त्यानंतर त्याने तरुणांना संबोधित केलं. आपला प्रचंड विजय झाला. आपण जिंकलो… असं तो म्हणत होता आणि जेनजी त्याच्या प्रत्येक शब्दाला उचलून धरून जल्लोष करत होती. दुनिया झुकते, फक्त झुकवणारा हवा, असं दीपकेंनी म्हणताच एकच जल्लोष झाला. हा जल्लोष सुरू असतानाच त्याने नीट परीक्षेमुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्या सर्वांची त्याने नावे घेतली. या मुलांना न्याय मिळाला, असं दीपके म्हणाला.

अंगात ताप, पण जोश भन्नाट

अभिजीत दीपके गेल्या तीन चार दिवसापासून आजारी आहे. दीपेकला टायफॉईड झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अंगात ताप असूनही त्याने मैदान सोडलेलं नाही. हाताला सलाईनचं इंजेक्शन लावून तो तरुणांमध्ये मिसळत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्यांना हुरुप देत आहे. आपल्याला लढायचंच आहे, आणि प्रधान यांचा राजीनामा घेऊन जायचंच आहे, असं तो सांगताना दिसत होता. आज त्याच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय झालाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us