विद्यार्थ्यांचा अभिमान आहे, परंतू दोन मागण्या अजून शिल्लक आहेत, काय म्हणाले राहुल गांधी ?

कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतरवर मोठे आंदोलन उभारले. त्यानंतर अडीच महिन्यानंतर अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या संदर्भात आता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

विद्यार्थ्यांचा अभिमान आहे, परंतू दोन मागण्या अजून शिल्लक आहेत, काय म्हणाले राहुल गांधी ?
rahul gandhi demand
| Updated on: Jul 25, 2026 | 5:39 PM

CJP च्या आंदोलनाने अखेर आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शाबास देशभरातील विद्यार्थ्यांनो, आम्हाला या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे मोठे पाऊल आहे. हे एक प्रतिकात्मक पाऊल आहे. रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक तरुणाचे मी अभिनंदन करतो. परंतू दोन मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत असे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने आपल्या एज्युकेशन सिस्टीमला सुधारण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. शाबास देशभरातील विद्यार्थ्यानो, तुम्हा सर्वांवर आम्हाला अभिमान आहे.

रस्त्यावर येऊन लोकशाही, संविधान आणि आपल्या भविष्याच्या रक्षणासाठी ठामपणे उभे राहणाऱ्या एका युवा, प्रत्येक विद्यार्थ्याचे खूपखूप अभिनंदन असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मात्र, आता दोन मागण्या अजूनही शिल्लक आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थी आणि भारताच्या भविष्याला सन्मान देत माफी मागावी, आणि विद्यार्थ्यांवर हिंसेचा वापर करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

आपल्या समाजातील दुसरे वर्ग शेतकरी, मजूर, गरीब आणि प्रत्येक जो व्यक्तीला या सरकारने दाबले आहे, चिरडले आहे. आपल्या सन्मानासाठी संविधानिक पद्धतीने ठामपणे उभे राहण्यात खरे साहस आहे. या सरकारला हटवण्याची वेळ आली आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

येथे पोस्ट वाचा –

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us