CJP protest : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत, समोर आलं मोठं कारण
मोठी बातमी समोर येत आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीच्या जतंर मंतरवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीयेत.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे सध्या देशात वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीकडून सुरू आहे. आपल्या या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून सीजेपीचं दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. सीजेपीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती, तसचे आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा देखील करण्यात आला. आज देखील कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारची एक महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र या बैठकीत देखील सीजेपीचं शिष्टमंडळ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं पहायला मिळालं.
या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीयेत. याच्या पाठीमागे एक खास कारण आहे. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारचं आसं म्हणणं आहे की, राजीनामा देऊन आपल्या जबाबदारीतून पळ काढणं हे खूप सोपं काम आहे, त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार नाहीयेत.
एका इंग्रजी वृत्तपत्राने सरकारी सुत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार नाहीयेत. राजीनामा देऊन जबाबदारीपासून पळ काढणं हे खूप सोपं काम आहे. परंतु जनतेनं जनादेश दिला आहे, त्यासाठी काम करायचं आहे, त्यामुळे प्रधान राजीनामा देणार नाहीत, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे वातावरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीची आहे, त्यासाठी एक मोठं आंदोलन उभारण्यात आलं आहे, या आंदोलनाला आता विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर येत्या 26 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्या येणार आहे. या दोन्ही पक्षाने देखील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.