ऑपरेशनमधून काहीच निघाले नाही, डॉक्टर म्हणाले सॉरी…उडाली खळबळ

डॉक्टर म्हणजे आपण देव समजतो. परंतू कलीयुगातील काही डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार करीत असल्याचे अधून मधून उघडकीस येत असते. असेच एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलेले आहे.

ऑपरेशनमधून काहीच निघाले नाही, डॉक्टर म्हणाले सॉरी...उडाली खळबळ
| Updated on: Nov 20, 2024 | 5:05 PM

बिहारच्या मुजफ्फरपुर येथे डॉक्टरांच्या हलगर्जीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथील सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या 12 वर्षांच्या मुलीचे डॉक्टरांनी अपेंडीक्सचे ऑपरेशन केले. ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टरांना कळले की या मुलीला तर अपेंडीक्स नव्हता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या पालकांची या डॉक्टराविरोधात हलगर्जीचा आरोप करीत विभागीय अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार केलेली आहे. ऑपरेशननंतर आपली मुलगी दीड तास बेशुद्ध होती. तिला जेथे बेडवर झोपवले तेथे कचऱ्याचा डबा ठेवला होता असा आरोप पालकांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या मुलीच्या पोटात दुखत होते, तिचे अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी देखील केली होती. डॉक्टरांनी तिला अपेंडिक्स झाल्याचे सांगितले आणि तिचे ऑपरेशन केले. जेव्हा तिला अपेंडिक्स नसल्याचे उघड झाले तेव्हा डॉक्टरांनी पेशंटच्या पालकांना सॉरी म्हटले. हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहचले तेव्हा चौकशीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात डॉक्टरांच्या हलगर्जीने पालक संतापले आहेत. टाके घातल्यानंतर डॉक्टर या मुलीला पहाण्यासाठीही आले नाहीत.

सोनोग्राफीनंतर ऑपरेशन झाले

पीडीत मुलगी बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील कांटी मानपुरा येथे राहणारी आहे. तिची आई सुमित्रा यांनी सांगितले की मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला 28 ऑक्टोबर रोजी सदर हॉस्पिटल मध्ये भरती केले होते. डॉक्टरांनी तपासले आणि तिला अपेंडिक्स असल्याचे सांगत तिची सोनोग्राफी केली. तिचे रक्त देखील तपासण्यात आले. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. तिचे नंतर ऑपरेशन करण्यात आल्याचे तिची आई सुमित्रा यांनी सांगितले.

दीड तास चालले ऑपरेशन

आपल्या मुलीचे दीड तास ऑपरेशन चालले. एवढा वेळ का लागला असे आपण विचारले असता डॉक्टरांनी तिला अपेंडीक्स नसल्याचे सांगितल्याचे सुमित्रा म्हणाल्या. डॉक्टर आपल्याला सॉरी म्हणू लागल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे नातेवाईकांच्या रागाचा पारा वाढला. ऑपरेशन झाल्यानंतर संबंधित डॉक्टर पुन्हा पाहायला देखील आला नाही. आपल्या मुलीला बेशुद्धावस्थेत कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवल्याचे सुमित्रा यांनी म्हटले आहे.या संदर्भात मुलीच्या पालकांनी लिखित तक्रार केली आहे. तसेच रुग्णालयाच्या अधिक्षकांना देखील तक्रार केलेली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.