America Tariff : ट्रम्प यांचा भारताला मोठा दणका, आता या क्षेत्रावर लावला 100 टक्के टॅरिफ, नव्या घोषणेनं खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषधांवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर त्यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

America Tariff : ट्रम्प यांचा भारताला मोठा दणका, आता या क्षेत्रावर लावला 100 टक्के टॅरिफ, नव्या घोषणेनं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2025 | 8:52 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी मोठा निर्णय घेतला आहे, संपूर्ण जगाला त्यांनी आणखी एक मोठा झटका दिला आहे. अमेरिकेच्या बाहेर बनलेल्या सर्व चित्रपटांवर त्यांनी 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तयार झालेल्या चित्रपटांवर देखील अमेरिकेमध्ये आता 100 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.हा भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी मोठा धक्का मानला जात असून, यामुळे भारतीय चित्रपट उद्योगाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत भारतीय चित्रपट उद्योग हा अंदाजे 20 मिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचला आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय चित्रपटांच्या अमेरिकेत होणाऱ्या व्यावसायामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे, चित्रपटांच्या कमाईला देखील याचा मोठा फटका बसणार आहे. कोरोनापूर्व काळात अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा बाजार हा आठ मिलियन डॉलरच्या आसपास होता, मात्र कोरोनानंतर या क्षेत्रात झपाट्यानं वाढ झाली. हा व्यावसाय आठ मिलियनवरून तब्बल वीस मिलियनवर पोहोचला आहे. मात्र आता ट्रम्प यांनी भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे, त्यांनी अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर टॅरिफ लावल्याची घोषणा करतानाच मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्या देशातील चित्रपट व्यावसाय हा इतर देशांनी चोरला आहे. जसं एखाद्या लहान मुलाकडून त्याचं चॅकलेट हिसकावून घेतलं जातं, त्याच प्रकारे दुसऱ्या देशांनी आपल्या देशातील चित्रपट व्यावसाय चोरला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या आणि कधीही न सुटणाऱ्या समस्येवर मी तोडगा काढला आहे, अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटावर आता इथून पुढे शंभर टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. या गोष्टींकडे लक्ष दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, MAKE AMERICA GREAT AGAIN असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.