
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला केला, त्यानंतर त्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली, निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण चांगलंच तापलं आहे. रशिया आणि चीनकडून या अटकेचा निषेध करताना निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तातडीने सुटका करावी अशी मागणी अमेरिकेकडे करण्यात आली होती. हे आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांंचं उल्लंघन आहे, असं चीनने म्हटलं होतं. चीन आणि रशियाकडून मादुरो यांच्या अटकेला विरोध होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या दोन्ही देशांसोबत अमेरिकेचं फार काही सौख्य नाही, अमेरिका या दोन्ही देशांना आपला प्रतिस्पर्धी मानत आला आहे, तर दुसरं कारण म्हणजे व्हेनेझुएलामध्ये तेलाचे साठे प्रचंड प्रमाणात आहेत. व्हेनेझुएला हा रशिया आणि चीनला मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा करतो, जर हे तेलाचे साठे अमेरिकेच्या ताब्यात गेले तर हा व्यापार विस्कळीत होणार असून, त्याचा सर्वात मोठा फटका हा रशिया आणि चीनला बसणार आहे, त्यामुळेच रशिया आणि चीनने अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे.
दरम्यान अमेरिका केवळ व्हेनेझुएलावर हल्ला करूनच थांबली नव्हती, तर अमेरिकेनं रशियाला देखील डिवचण्याचं काम केलं होतं. अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या समुद्रात रशियाचं एक तेल टँकर ताब्यात घेतलं होतं, त्यावरील कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर रशियानं देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं, दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना आता अमेरिकेनं नमत घेत, या ऑईल टँकरवरील रशियामधील कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्याचं पालन करावं असं रशियानं म्हटलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेनं ऑईल टँकरवरील कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे.
दरम्यान दुसरीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर चीनने देखील अमेरिकेला चांगलंच घेरलं आहे. चीनकडून या घटनेचा निषेध करण्यात आला असून, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींची तातडीने सुटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता यावरून वातावरण आणखी तापण्याची शक्यात आहे.