Chhindwada : छिंदवाड्यात ब्रेक फेल झाल्याने डीजे वाहन गर्दीत घुसले; 13 भाविक जखमी, तीन जण गंभीर

| Updated on: Dec 26, 2021 | 3:53 PM

शनिवार असल्याने सर्व भाविक जाम सावली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी चालले होते. हनुमान दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. सदर पदयात्रा पांढुर्णा येथून जाम सावली येथे आली होती.

Chhindwada : छिंदवाड्यात ब्रेक फेल झाल्याने डीजे वाहन गर्दीत घुसले; 13 भाविक जखमी, तीन जण गंभीर
छिंदवाड्यात ब्रेक फेल झाल्याने डीजे वाहन गर्दीत घुसले; 12 भाविक जखमी, तीन जण गंभीर
Follow us on

छिंदवाडा : डीजे लावलेल्या मिनी ट्रकचा ब्रेक फेल होऊन भाविकांच्या गर्दीत घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत 13 भाविक जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी छिंदवाड्यात घडली आहे. जखमी भाविकांपैकी तीन भाविकांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना सौसर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींपैकी एक भाविक महाराष्ट्रातील रहिवासी आहे. पवन पिता हेमराज भोंगर (जामगाव, महाराष्ट्र), जय पिता नंदू तुमराम (नंदनवाडी पांडूर्णा) आणि करण पिता अंतराम सलामे (पांडूर्णा) अशी गंभी जखमींची नावे आहेत.

डीजे ठेवलेल्या मिनी ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घडली दुर्घटना

दुर्घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी डीजेची तोडफोड केली. सर्व भाविक जाम सावलीतील हनुमान मंदिरात पदयात्रा करीत चालले होते. भाविकांच्या मागोमाग डीजे लावलेला मिनी ट्रक चालला होता. मात्र ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला आणि भाविकांच्या गर्दीत घुसला. ट्रकच्या पुढे भक्तिगीतांच्या तालावर नाचण्यात मग्न असलेले भाविक ट्रकखाली चिरडले गेले. जखमींना तात्काळ सौसर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे रेफर केले. या दुर्घटनेत तीन भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये एकच गोंधल उडाला. जीव वाचवण्यासाठी भाविक इकडे तिकडे पळू लागले.

सदर पदयात्रा पांढुर्णा येथून आली होती

सदर दुर्घटना शनिवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवार असल्याने सर्व भाविक जाम सावली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनासाठी चालले होते. हनुमान दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. सदर पदयात्रा पांढुर्णा येथून जाम सावली येथे आली होती. पांढुर्णातील हजारो भाविक या पदयात्रेत सहभागी झाले होते. अचानक यात्रेतील डीजे ठेवलेल्या मिनी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रक यात्रेत घुसला. ट्रकच्या छतावरही काही भाविक बसले होते, अशी माहिती एसडीओपी एसपी सिंह यांनी दिली.

इतर बातम्या

Accident | भरधाव काळी पिवळी-बोलेरची जोरदार धडक! 3 मृतांपैकी दोघे जागीच ठार, तर एक…

Nashik Crime | मेरी गाडी को कट क्यों मारा म्हणत नाशिकमध्ये भरदिवसा 5 लाखांची लूट; नागरिकांमध्ये दहशत