
टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे ड्युओलॉग एनएक्सटी या शो चे सूत्रसंचालन करत आहेत. या शोच्या नवीन भागात बरुण दास यांनी डॅन्यूब ग्रुपच्या संचालिका, उद्योजक आणि जागतिक स्तरावरील इन्फ्लुएंसर सना साजन यांच्याशी संवाद साधला आहे. या दोघांमधील संवादामध्ये सना यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला आहे. बरुण दास म्हणतात की, ‘सना ही आधुनिक बदल घडवणाऱ्या व्यक्तीचे रूप आहे, जी प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये रुपांतरीत करते आणि आपले लक्ष्य गाठते.’
बरुण दास यांच्यासोबतच्या मुलाखतात आपले विचार मांडताना सना साजन म्हणाल्या की, ‘ड्युओलॉग एनएक्सटीवर बरुण दास यांच्यासोबत झालेली माझी चर्चा खरोखरच अद्भुत आणि मानसिकदृष्ट्या खूप उत्तेजक होती. मी त्यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला आणि अशाच प्रकारच्या आणखी मुलाखचीची अपेक्षा करते. मला इथून काहीतरी नेत असल्याचा आनंद आहे.
सना साजन यांची ही मुलाखत आधुनिक जागतिक नागरिक असण्याचा अर्थ काय आहे? यावर प्रकाश टाकते. सना यांनी बदल स्वीकारण्याबद्दल, स्वतःच्या उद्देशाशी प्रामाणिक राहण्याबद्दल आणि जीवनातील चॅलेंज स्वीकारण्याबद्दल भाष्य केले आहे. बरुण दास हे त्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल आणि यशाबद्दल प्रश्न विचारत आहेत. यामुळे दोघांमधील संवाद हा एका नव्या उंचीव पोहोचताना दिसत आहे.
या मुलाखतीची सुरुवात सना यांच्या सुरुवातीच्या प्रवासापासून होते. ‘हा आयुष्यभराचा प्रवास राहिला आहे, अनेक चढ-उतार आले आहेत, कधीकधी तुम्हाला एखाद्या ठिकाणा पोहोचण्यासाठी माघारही घ्यावी लागले. अनेकदा अडथळे अनपेक्षित पायऱ्या बनतात आणि आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो.’ सना यांनी पुढे बोलताना महत्वाकांक्षा आणि प्रामाणिकपणा यशासाठी कसे फायदेशीर ठरतात यावर भाष्य करतात.
या दोघांमधील संभाषण हे हृदय आणि बुद्धीने नेतृत्व करणे म्हणजे काय याचे एक उदाहरण आहे. प्रेक्षकांना ही मुलाखत पाहून ही केवळ एक मुलाखत नसून जगण्यासाठी प्ररणा असल्याची भावना येईल. ड्युओलॉग हा पुढचा भाग केवळ संभाषण नाही, तर तो महत्त्वाकांक्षा, सहानुभूती आणि यशस्वी बनण्याच्या कलेवर चिंतन करण्याचे आमंत्रण आहे.
ड्युओलॉग NXT ही बरुण दास यांची न्यूज9 ची मूळ पॉडकास्ट सारिज आहे. यात तरुण महिलांच्या यशाचे रहस्य उलगडण्याचे आणि त्यांचा प्रवास समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. ही पॉडकास्ट सारिज प्रेरणा आणि धेय्य केंद्रित संभाषणाचे एक अद्वितीय मिश्रण आहे जी भारत आणि त्यापलीकडे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रेरणा देते आणि मार्गदर्शन करते.