AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6000 वर्षांपूर्वीच्या सुर्यग्रहणाचा आतापर्यंतचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात, संशोधक आश्चर्यचकीत

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे मयंक वाहिया आणि जपानच्या नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीतील मित्सुरू सोमा यांनी त्याचा अभ्यास केला आहे. 

6000 वर्षांपूर्वीच्या सुर्यग्रहणाचा आतापर्यंतचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदात, संशोधक आश्चर्यचकीत
solar Eclipses
| Updated on: Sep 03, 2024 | 8:34 PM
Share

जगातल्या सर्वात जुन्या सुर्यग्रहणाचा शोध लागला आहे. हिंदू धर्मातील ऋग्वेदात या सुर्यग्रहणाची नोंद आहे. हे सुर्यग्रहण तब्बल सहा हजार वर्षांपूर्वी घडले होते. ज्याचा उल्लेख हिंदू धर्माच्या चार वेदांपैकी ऋग्वेदात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा शोध एका भारतीय आणि दुसऱ्या जपानी संशोधकांनी लावला आहे. या सुर्यग्रहणांची नोंद हजारो वर्षांपूर्वी नोंदून ठेवलेली आढळली आहे. खगोलशास्रज्ञांनी ऋग्वेदात केलेला हा उल्लेख खरा असल्याचे सांगितले आहे. ही घटना सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीची मानली जात आहे. ऋग्वेदात अनेक धार्मिक आणि अवकाश दर्शनाचे उल्लेख केलेले आहेत.

ह्या कथा साल 1500 ईसवी सन पुर्वीच्या मानल्या जात आहेत. अन्य सर्व धार्मिक ग्रंथ आणि पुस्तकांसारखेच ऋग्वेदात प्राचीन घटनांचे उल्लेख आहेत. काही ग्रंथात प्राचीन वस्तूंबाबत आणि घटनांबाबत उल्लेख केलेला आहे. परंतू ऋग्वेद सर्वात जुने आहे. ज्यात अनेक वेळा वर्नल इक्वीनॉक्स (Vernal Equinox- विषुववृत्त ) मध्ये सुर्य उगवल्याचे उल्लेख आहेत. जेथे दुपारी सुर्य थेट डोक्यावर तळपतो.

एका जागी लिहीले आहे की इक्वीनॉक्स ओरियन नक्षत्रात होत आहे. दुसरा प्लीयेड्स (Pleiades) नक्षत्रामध्ये आहे.या डिस्क्रीप्शनने एस्ट्रॉनॉमर्स तपास सुरु केला आहे.तारीख शोधायला लागली. पृथ्वी सुर्याभोवती फिरता फिरता स्वत:च्या अक्षाभोवती तिरकी फिरते. या वेळेचा वर्नल इक्वीनॉक्स पायसेस नक्षत्रात आहे.  म्हणजेच या अर्थ की ओरियन हे नक्षत्राचे नाव इसवी सन 4500 पूर्वी होते. आणि प्लीयेडस् नक्षत्र इसवी सन 2230 पूर्वी होते. या सांकेतिक भाषेता अभ्यास भारतीय आणि जपानी संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी हे मान्य केले की ऋग्वेदात अनेक अवकाशीय घटनांचा उल्लेख त्या घटना ज्यावेळी संशोधित झाल्या नव्हत्या तेव्हा लिहीलेल्या आहेत. ऋग्वेदाची भाषा जास्त सांकेतिक आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे मयंक वाहिया आणि जपानच्या नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीतील मित्सुरू सोमा यांनी त्याचा अभ्यास केला आहे.

 सूर्य ग्रहणाचं कारण काही  वेगळेच लिलीलंय

या दोघांना प्राचीन सुर्यग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आढळला. त्यांचा हा अभ्यास स्टडी जर्नल ऑफ एस्ट्रोनॉमिकल हिस्ट्री एंड हेरिटेजमध्ये प्रकाशित झाला आहे. ऋग्वेदात जी कहाणी सांगितली आहे ती राहु-केतू वाल्याकहाणीपेक्षा वेगळी आहे. या राहु केतूच्या कहाण्यानंतर रचल्या गेल्या असाव्यात. सुर्यग्रहणाचे कारण ऋग्वेदात वेगळे दिलेले आहे.

ऋग्वेद  काळात घडलेल्या घटनांचा यात उल्लेख

दोन्ही संशोधकांना ओरियन नक्षत्राच्या वेळी वर्नल इक्वीनॉक्सची ( स्थानिय विषृववृत्त) तारीख शोधायला सुरुवात केली. कारण प्राचीन सुर्यग्रहण याच तारखेला झाले होते. हे सर्वात आधी नोंदवले गेलेले लिखित संपूर्ण सुर्यग्रहण मानले जात आहे. म्हणजे त्यावेळी ऋग्वेदात लिहीणारे जिवित होते. त्याच्या समोर ही घटना घडल्यानेच त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे.

दोन आणखी संस्कृतींनी  उल्लेख केलाय

एकूण मिळून दोन संशोधकांनी केलेल्या गणने प्रमाणे हे सर्वात जूने सुर्यग्रहण इसवी सन पूर्व 22 ऑक्टोबर 4202 रोजी आणि इसवी सन पूर्व 19 ऑक्टोबर 3811 या दरम्यान केव्हा तरी घडले असू शकेल. सिरीयात यापूर्वी एका मातीचा टॅबलेट सापडला होता.त्यावर सर्वात जुन्या सुर्यग्रहणाचा उल्लेख होता. ही घटना इसवी सन पूर्व 1375 ते 1223 दरम्यानची म्हटली जात आहे. या शिवाय आर्यलॅंड येथे इसवी सन पूर्व 3340 मध्ये सुर्यग्रहणाची रॉक कार्व्हींग सापडली होती.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.