
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) नवव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि विद्यापीठातील प्राध्यापकांसह इतर अधिकाऱ्यांना संबोधित केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणात JNUचे कौतुक केले. जेएनयू ही अशी एक प्रयोगशाळा आहे जी त्याच्या काळाच्या खूप पुढे आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्र्यांह पराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन हेही उपस्थित होते.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, जेएनयूचा स्वतःचा समृद्ध वारसा आहे. Interdisciplinary research focus, हा जेएनयूच्या डीएनएचा एक भाग आहे. जेएनयूचे शैक्षणिक वातावरण नेतृत्व विकासाचे एक शक्तिशाली केंद्र राहिले आहे. जेएनयू आता केवळ एक संस्था राहिलेली नसून ती एक संस्कृती आहे असंही धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केलं.
यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी जेएनयूच्या काही माजी विद्यार्थ्यांबद्दलही सांगितले, ज्यात डीपी त्रिपाठी, कॉम्रेड सीताराम येचुरी, कॉम्रेड प्रकाश आणि सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांचे चांगले मित्र आणि विद्यमान संसद सदस्य डॉ. जॉन बिट्रोस यांच्यासारख्या माजी विद्यार्थ्यांनी सार्वजनिक जीवनात एक ठसा उमटवल्याचंही त्यांनी नमूद केलं.
JNU की डिग्री केवल व्यक्तिगत उपलब्धि नहीं, बल्कि समाज के प्रति एक जिम्मेदारी है।
मेरा विश्वास है कि JNU की inclusivity, social justice और responsibility की परंपरा आगे बढ़ाते हुए यहाँ के विद्यार्थी विकसित भारत के लक्ष्य की सिद्धि में महत्वपूर्ण भूमिका निभाएँगे। #Convocation… pic.twitter.com/ZyxuK5tf7Z
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) January 12, 2026
क्रिटिकल थिंकीग हा जेएनयूचा आत्मा
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जेएनयूचे कौतुक केले आणि म्हणाले की, क्रिटिकल थिंकीग हे जेएनयूच्या आत्म्यात आहे. जेएनयूमध्ये वादविवाद, चर्चा, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि बौद्धिक देवाणघेवाणीची एक जिवंत संस्कृती आहे. जेएनयू हे एक बौद्धिक केंद्र राहिलं आहे जिथे विचार परखले जातात आणि विकास केला जातो, जे नंतर राष्ट्रीय धोरणांमध्ये योगदान देतात असं ते म्हणाले.
तुमच्यापैकी काहींनी संसद आणि विधानसभेत पोहोचून लोकशाही मजबूत करावी, काहींनी कर्तव्य भवनात देशसेवेची जबाबदारी पार पाडावी, काहींनी धोरणात्मक तज्ञ आणि राजदूत म्हणून भारताची जागतिक भूमिका मजबूत करावी असंही शिक्षण मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये विद्यार्थ्यांबद्दल लिहीलं. काहींनी नवोन्मेष आणि उद्योजकतेद्वारे स्टार्ट-अप्स आणि युनिकॉर्नचा पाया रचला पाहिजे आणि काहींनी लेखक, पत्रकार आणि समाजाचे विचारवंत बनून राष्ट्राच्या वैचारिक प्रवचनाला दिशा दिली पाहिजे असंही त्यांनी त्यात नमूद केलं.
पदवी मिळवणं ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही
पुढे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, जेएनयूमधून पदवी मिळवणं ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. JNUची समावेशकता, सामाजिक न्याय आणि जबाबदारीची परंपरा पुढे नेऊन, येथील विद्यार्थी विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा मला विश्वास आहे.सर्व पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरी करण्याची समान संधी देऊन जेएनयूने एक आदर्श निर्माण केला आहे असंहीते पुढे म्हणाले.