AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम, एक अधिकारी असं काही बोलून गेला की… अमेरिकेत खळबळ

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. आता पॉवेल यांची एका प्रकरणात फौजदारी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम, एक अधिकारी असं काही बोलून गेला की... अमेरिकेत खळबळ
Trump Vs PowellImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 4:49 PM
Share

अमेरिकन प्रशासनात सध्या सर्वकाही आलबेल नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. रविवारी जेरोम पॉवेल यांनी एक निवेदन जारी करत आपल्याविरुद्ध फौजदारी चौकशी सुरू झाली असल्याची माहिती दिली आहे. यानंतर त्यांनी म्हटले की, ‘अशा धमक्या म्हणजे व्याजदर निर्णयांबाबत अमेरिकन सेंट्रल बँकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे पण मी शेवटपर्यंत हार मानणार नाही.’ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जेरोम पॉवेल यांची चौकशी होणार

बिझनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाढत्या संघर्षादरम्यान फेडरल अभियोक्त्यांनी फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्याविरुद्ध फौजदारी चौकशी सुरू केली आहे. याबाबत पॉवेल म्हणाले की, ‘गेल्या शुक्रवारी न्याय विभागाने फेडरल रिझर्व्हला ग्रँड ज्युरी समन्स जारी केला आहे. यात जून 2025 मध्ये सिनेट बँकिंग समितीसमोर दिलेल्या साक्षीशी संबंधित फौजदारी आरोपांची धमकी देण्यात आली आहे.’ यामुळे जेरोम पॉवेल यांच्याविरुद्ध एक नवीन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. मात्र पॉवेल यांनी म्हटले की, ‘ही कारवाई व्यापक राजकीय संदर्भात पाहिली पाहिजे. कोणीही कायद्याच्या वर नाही.’

हा व्याजदरांचा प्रश्न…

जेरोम पॉवेल यांनी पुढे म्हटले की, ‘हे संपूर्ण प्रकरण काँग्रेसची दिशाभूल करणे किंवा देखरेख टाळणे याबद्दल नाही. ही धमकी गेल्या जूनमध्ये साक्षीशी किंवा फेडरल रिझर्व्ह इमारतींच्या नूतनीकरणाशी संबंधितही नाही. ही धमकी थेट चलनविषयक धोरण निर्णयांशी जोडली पाहिजे. फौजदारी आरोपांची धमकी ही फेडरल रिझर्व्हने राष्ट्रपतींच्या प्राधान्यांचे पालन करण्याऐवजी सार्वजनिक हितासाठी व्याजदर निश्चित केल्यामुळे देण्यात आली आहे.’

मी झुकणार नाही…

ट्रम्प प्रशासनाच्या चौकशीवर बोलताना पॉवेल म्हणाले की, ‘मी कोणत्याही प्रकारच्या दबावापुढे झुकणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहीन. सार्वजनिक सेवेसाठी कधीकधी धमक्यांना तोंड देऊन खंबीर राहावे लागते. मी अमेरिकन लोकांची सेवा करण्यासाठी सिनेटने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडत राहील.’ पॉवेल यांच्या या विधानामुळे ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.

काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.