AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीची आयुष्यातली सर्वात मोठी चूक, तो निर्णय घेतला नसता तर…प्रसिद्ध खेळाडूने सगळं सांगितलं!

विराट कोहली हा स्टार फलंदाज आहे. तो एकदा मैदानात उतरला की धावांचा पाऊस पडतो. परंतु आता त्याच्या निवृत्तीबाबत बोलले जात आहे. विराटने निवृत्तीचा निर्णय घेऊन चूक तर केली नाही ना? अशी भावना व्यक्त केली जात आहे.

विराट कोहलीची आयुष्यातली सर्वात मोठी चूक, तो निर्णय घेतला नसता तर...प्रसिद्ध खेळाडूने सगळं सांगितलं!
virat kohliImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 4:54 PM
Share

Virat Kohli Retirement : विराट कोहली हा भारताचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो मैदानावर आला की चाहते त्याच्या नावाचा जयघोष करतात. विशेष म्हणजे तो फलंदाजाली बॅट घेऊन आला की मैदानावर धावांचा पाऊस पडतो. बडोद्यात न्यूझिलंडविरोधात झालेल्या सामन्यात त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. त्याने तब्बल 93 धावा केल्या. विराटच्या दमदार खेळीमुळेच भारताला विजयी पताका फडकवता आली. दरम्यान, विराट कोहली सध्या एकदीवसीय सामन्यांत खेळताना दिसतो. हाच मुद्दा उपस्थित करत विराटबद्दल एका बड्या खेळाडूने मोठे विधान केले आहे. विराट कोहलीने निवृत्ती घ्यायला नको होती, असे मत या खेळाडूने व्यक्त केले आहे.

काय म्हणाले डोनाल्ड?

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कसोटी तसेच टी-20 खेळप्रकारातून निवृत्ती घेतलेली आहे. सध्या तो फक्त एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड यांनी विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. विराटने कसोटी क्रिकेटमधून खूप लवकर निवृत्ती घेतली, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सोबतच विरोट कोहलीची 2027 सालाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक खेळण्याची त्याची भूक कायम आहे, असेही डोनाल्ड म्हणाले आहेत.

कोहलीमध्ये क्रिकेट खेळण्याची भूक…

डोनाल्ड यांनी याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या संघाच्या गोलंदाजी विभागाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. याच काळात डोनाल्ड आणि विराट एकमेकांच्या संपर्कात आले. डोनाल्ड यांनी विराट कोहलीचा खेळ त्याआधीही पाहिलेला आहे. विराट कोहलीमध्ये क्रिकेट खेळण्याची भूक अन्य कोणत्याही खेळाडूत नाही. ड्रेसिंग रुममध्ये मी त्याला नेहमी चॅम्पियन म्हणायचो. मला तो मशीन असल्यासारखेच वाटचे, असे मत डोनाल्ड यांनी व्यक्त केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट कोहलीने चूक केली?

तसेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय खूपच लवकर घेतला. मला त्याची कसोटी क्रिकेटमध्ये फार उणीव भासते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेऊन सर्वात मोठी चूक केली ना? अशी भावना व्यक्त केली जात आहे.

काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर
काल आदानींच साम्राज्य दाखवून भाजपवर टीका,आज राज ठाकरेंचा तो फोटो बाहेर.
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर
ठाकरेंना अदानी नव्हे तर... राज ठाकरे यांना नितेश राणेंचं प्रत्युत्तर.
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका
संघर्ष मराठीचा की ठाकरेंच्या अस्तित्वाचा? ठाकरे बंधूंवर फडणवीसाची टीका.
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'
'बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले...'.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.