Ravindra Chavan : लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य अन् राजकीय वर्तुळात चर्चा
कल्याण-डोंबिवलीतील मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठा मित्र लवकरच भाजपमध्ये सामील होणार असल्याचे सूचक विधान केले आहे. चव्हाण यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठे बदल अपेक्षित असल्याचे संकेत मिळत आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारीही भाजपमध्ये दाखल झाले. हा पक्षप्रवेश मित्रत्वाच्या नात्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण सूचक वक्तव्य केले आहे. चव्हाण यांनी म्हटले की, “बरेच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाही, त्यामुळे सर्व मित्र हळूहळू एकत्र यायला सुरुवात झाली आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, “मोठा मित्र सुद्धा लवकरच भाजपमध्ये येईल, याची मला खात्री आहे. कधी यायचं हे फक्त वेळ आणि काळ शोधतोय. कधी ना कधीतरी एक दिवस तो मित्र नक्कीच येईल.” त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा पक्षप्रवेश आणि चव्हाण यांचे विधान आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि संभाव्य युती-आघाडीच्या समीकरणात मोठे बदल घडवण्याची शक्यता दर्शवते.
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

