Mobile Blast while online Class | ऑनलाईन क्लास सुरु असताना मोबाईलचा स्फोट, आठवीतला विद्यार्थी गंभीर जखमी!

| Updated on: Dec 17, 2021 | 2:55 PM

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा या मुलाच्या घरी कुणीही नव्हतं. मुलाचे आईवडील घरी नसल्यानं स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांचीही एकच पळापळ झाली.

Mobile Blast while online Class | ऑनलाईन क्लास सुरु असताना मोबाईलचा स्फोट, आठवीतला विद्यार्थी गंभीर जखमी!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मध्य प्रदेश : ऑनलाईन क्लासदरम्यान (Online Class) मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होऊन आठवीतील एक विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झालाय. ही घटना घडली आहे मध्यप्रदेशातील (Madya Pradesh) सटणामध्ये (Satna) नेण्यात आलं, असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे.

काय घडलं? कसं घडलं?

15 वर्षांचा मुलगा ऑनलाईन क्लास अटेंड करत होता. ऑनलाईन क्लासदरम्यान अचानकच मोबाईलचा जोरात स्फोट झाला. या स्फोटात आठवीत शिकणारा 15 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. मध्य प्रदेशच्या सटणापासून 35 किलोमीटर दूर असलेल्या एका छोटाशा गावात ही घटना घडली आहे.

दरम्यान, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा या मुलाच्या घरी कुणीही नव्हतं. मुलाचे आईवडील घरी नसल्यानं स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांचीही एकच पळापळ झाली. भयभीत झालेल्या शेजाऱ्यांना जेव्हा मोबाईलचा स्फोट झाल्याचं कळलं, त्यानंतर त्यांनी मुलाला लगेचच वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात नेलं. रामप्रकाश भदौरीया असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे.

रामप्रकाशच्या घरातील सर्वजण कामानिमित्त घराबाहेर गेले होते. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना रामप्रकाशच्या आईवडिलांना नंतर कळवण्यात आली. ऑनलाईन क्लासदरम्यान घडलेल्या या घटनेनंतर रामप्रकाशच्या पालकांनाही धक्काच बसला. त्यांनीही तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. सुरुवातील रामप्रकाश भदौरीया याला सटणामधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर पुढील उपचारांसाठी त्याला जबलपूरच्या रुग्णालायत नेण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कशामुळे झाला मोबाईलचा स्फोट?

दरम्यान, मोबाईलचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र मोबाईलची बॅटरी ओव्हरचार्ज झाल्यानं किंवा मोबाईल फोन गरम झाल्यामुळे त्याला स्फोट झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.

काय काळजी घ्यायला हवी? (How to prevent mobile blast)

मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे लहान मुलांचाही मोबाईलचा ऑनलाईन क्लासेससाठीचा वापरही वाढलाय. अशात मध्य प्रदेशात घडलेल्या घटनेनं ऑनलाईन क्लासदरम्यान मुलांना मोबाईल वापरायला देताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याचंही महत्त्व अधोरेखित केलंय. मोबाईल स्फोटासारख्या घटना टाळण्यासाठी काळजी घेतना खालील गोष्टी केल्यास धोका टाळता येणं सहज शक्य आहे.

  1. मोबाईल फोनला ओव्हरचार्ज करु नका.
  2. रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवून देणं टाळावं.
  3. फास्टचार्जिंगमुळेही अनेकदा बॅटरी खराब होऊन ती गरम होण्याची शक्यता असते.
  4. फोन चार्ज होत असताना शक्यतो वापरु नये!
  5. जर तुमचा फोन सातत्यानं गरम होत असेल, तर वेळीच त्याची बॅटरी तपासून घ्या.