ज्ञानेश कुमार राजीनामा द्या! दिल्लीत INDIA आघाडीची महारॅली; 4000 पोलीस, 200 CCTV आणि ड्रोनच्या घिरट्या, राजधानीला छावणीचे स्वरूप

INDIA Bloc Mega Rally in Delhi Ramlila Maidan: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा हुंकार भरला आहे. इंडिया आघाडी आज दिल्लीत महारॅली काढणार आहे. त्यासाठी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ज्ञानेश कुमार राजीनामा द्या! दिल्लीत INDIA आघाडीची महारॅली; 4000 पोलीस, 200 CCTV आणि ड्रोनच्या घिरट्या, राजधानीला छावणीचे स्वरूप
दिल्लीत INDIA आघाडीची महारॅली; राजधानीला छावणीचे स्वरूप
| Updated on: Nov 01, 2026 | 7:54 AM

INDIA Bloc Mega Rally in Delhi Ramlila Maidan: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीने पुन्हा एल्गार पुकारला आहे. आज दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधकांनी महारॅलीचे आयोजन केले आहे. निवडणूक आयोगाविरोधात देशभरातील विरोधक आज एकजूटता दाखवतील. शनिवार काँग्रेसने प्रतिसंसदेचे आयोजन केले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही प्रतिसंसद आयोजित करण्यात आली. त्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग लागू करण्याची शिफारस करण्यात आली.

मोर्चात सहभागी व्हा आणि खरेदीही करा

Loading...

एसआयआरमधील अनियमितता, मतदार प्रणालीतील अनियमिततेवर आणि देशातील कोट्यवधी नागरिकांची नावं वगळल्याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. गेल्या एक महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे आंदोलन दिल्लीत होत आहे. आता महारॅली आणि महाआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यात विरोधी बाकावरील झाडून सर्व खासदार उपस्थित असतील. तर या रॅलीसाठी लाखभर आंदोलक येण्याचा अंदाज आहे.

या रॅलीपूर्वी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोर्चेकरांना मोठे आवाहन केले आहे. या रॅलीत सहभागी व्हा. आंदोलनात सहभागी व्हा. पण आलेच आहात तर रामलीला मैदान आणि परिसरातील बाजारात थोडीफार खरेदीही करा असे आवाहन त्यांनी केले आहे. व्यापारी महासंघाने राहुल गांधी यांना दिवाळी तोंडावर असल्याने आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी हे आवाहन केले आहे. मला माहिती आहे, आंदोलक व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचा फायदा करतील. भाजपा घाबरलेली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

4 हजारांहून अधिक पोलीस, ड्रोनचे लक्ष

इंडिया आघाडीचे नेते एका खुल्या बसमधून रामलीला मैदानाकडे जाणार आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेर इंदिरा भवनसमोर ही बस असेल. त्यातून ते मिंटो ब्रिजपर्यंत जातील. त्यानंतर महारॅलीला सुरुवात होईल. ही महारॅली रामलीला मैदानात पोहचेल. दिल्लीत यापूर्वी इंडिया आघाडी आणि काँग्रेसने आक्रमक आंदोलन केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. आह. या कार्यक्रमात लाखभर लोक पोहचण्याची शक्यता आहे. त्यासाठी या परिसरात 4,000 पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारीही मैदानात असतील. यासोबतच ड्रोनचे ही लक्ष असेल. मोर्चात समजकंटक या परिसरात विघातक कृत्य करू नयेत यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us