एकाचवेळी तीन सरकारी नोकऱ्या करणाऱ्या इंजिनिअरचा 30 वर्षानंतर पर्दाफाश

बिहार सरकारच्या तीन वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या एका इंजिनिअरला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून हा इंजिनिअर सरकारच्या तीन वेगवेगळ्या विभागात काम करत होता.

एकाचवेळी तीन सरकारी नोकऱ्या करणाऱ्या इंजिनिअरचा 30 वर्षानंतर पर्दाफाश

पाटणा : बिहार सरकारच्या तीन वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या एका इंजिनिअरला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून हा इंजिनिअर सरकारच्या तीन वेगवेगळ्या विभागात काम करत होता. तसेच तिन्ही विभागाकडून पगारही घेत होता. गेले 30 वर्ष सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी या इंजिनिअरवर गुन्हा दाखल केला आहे. सुरेश राम असं या इंजिनिअर आरोपीचं नाव आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पाटणाच्या पुनपुन येथे राहणाऱ्या सुरेश रामला पहिल्यांदा 20 फेब्रुवारी 1988 मध्ये पाटणा येथील रस्ते, वाहतूक विभागात सहाय्यक इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर दुसऱ्यावर्षी 28 जुलै 1989 रोजी सुरेशला जल संसाधन विभागात नोकरी मिळाली. तसेच त्याचवर्षी त्याला जल संसाधन विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नोकरी मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पर्दाफाश कसा झाला?

अर्थ विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर कामासाठी सेंटरलाईज्ड फंड मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्यात आली होती. या माध्यमातून कर्मचाऱ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म तारीख याची माहिती घेण्यात आली होती. या नव्या प्रणालीमुळे सुरेश राम यांचा पर्दाफाश झाला. पर्दाफाश झाल्यानंतर सुरेशला राज्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने कागदपत्र घेऊन बोलवले तेव्हा तो फरार झाला. सुरेशच्या विरोधात सध्या प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल 

इंजिनिअर सुरेश रामच्या विरोधात किशनगंज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी अखिलेश सिंह यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आलं आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे, अशी पोलिसांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *