‘मेड इन भारत’ म्हणजेच सर्वोत्तम हे सुनिश्चित करा, ब्रँड INSIGHT कार्यक्रमात सद्गुरुंचे उद्योगपतींना आवाहन

Made In Bharat : कोयंबतूर येथील ईशा योगा सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय नेतृत्व कार्यक्रम ब्रँड INSIGHT मध्ये सद्गुरूंनी 100 पेक्षा जास्त उद्योग पतींना संबोधित केले.

मेड इन भारत म्हणजेच सर्वोत्तम हे सुनिश्चित करा, ब्रँड INSIGHT कार्यक्रमात सद्गुरुंचे उद्योगपतींना आवाहन
Sadhguru Brand INSIGHT
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 28, 2026 | 5:48 PM

28 फेब्रुवारी 2026 : कोयंबतूर येथील ईशा योगा सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय नेतृत्व कार्यक्रम ब्रँड INSIGHT दरम्यान 100 हून अधिक ब्रँड मॅनेजर्स, उद्योगमालक आणि सी-सूट अधिकाऱ्यांना संबोधित करत योगी व आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरू म्हणाले, ‘मेड इन इंडिया’ म्हणजेच सर्वोत्तम असे व्हायला हवे. तुम्ही असा ब्रँड उभारला पाहिजे. राष्ट्राचा ब्रँड उंचावला तर केवळ व्यवसायांचा नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा ब्रँड उंचावतो.

जागतिक स्तरावर मजबूत राष्ट्रीय प्रतिमेचा नागरिक आणि उद्योगांवर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित करत ते पुढे म्हणाले, की ‘तुमच्यापैकी अनेक जण परदेशात प्रवास करता. गेल्या पाच ते आठ वर्षांत तुम्ही पाहिले आहे का, भारतीय पासपोर्ट दाखवल्यावर लोक आधीपेक्षा अधिक आदराने पाहतात? हेच ब्रँड बिल्डिंग आहे. भारताने आपला ब्रँड जाणीवपूर्वक उभारला आहे. ते चांगले आहे. पण ते पुरेसे आहे का? नाही. हा ब्रँड अधिक मोठ्या पातळीवर नेण्याची गरज आहे. भारताचा ब्रँड एका विशिष्ट उंचीवर गेला तर इतर सर्व ब्रँड्ससाठी दारे आपोआप उघडतील. ते घडलेच पाहिजे.’

योगाच्या प्रभावीतेच्या तुलनेत ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे ब्रँडिंग कमी पडले, याकडे लक्ष वेधताना सद्गुरू म्हणाले की, ‘ब्रँडिंग हा प्रभावीतेचा एक भाग आहे. योग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मानवी जीवनावर त्याचा विलक्षण परिणाम आणि कार्यक्षमतेचा विचार करता जगातील प्रत्येकाने योगाचा स्वीकार केला पाहिजे. पण दीर्घकाळ त्याचे ब्रँडिंग योग्य झाले नाही. आम्ही ते बदलण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यासाठी मला विविध प्रकारे टीकेला सामोरे जावे लागते. इतक्या प्रभावी गोष्टीबद्दल आजही अनेकांना पुरेशी माहिती नाही.’

2023 मध्ये सुरू झालेल्या या ब्रँड INSIGHT कार्यक्रमाची रचना Sadhguru यांनी ब्रँड मॅनेजर्स, उद्योगमालक, सी-सूट अधिकारी आणि मार्केटिंग व्यावसायिकांसाठी केली आहे. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान होत असलेली सहावी आवृत्ती अनीशा मोटवानी (संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टॉर्म द नॉर्म) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली असून, अमीन हक (संस्थापक, स्टोरीवॉलाज), कृष्णन सुब्रमणियन (प्रिन्सिपल पार्टनर, डिस्रप्शन कन्सल्टिंग), राहुल जौहरी (संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार, फ्लिब्बर कन्सल्टिंग), सोनल दबराल (क्रिएटिव्ह कन्सल्टंट आणि माजी चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर, ओगिल्वी – दक्षिण व आग्नेय आशिया) आणि नारायण देवनाथन (अध्यक्ष व मुख्य रणनीती अधिकारी, डेंट्सू साऊथ आशिया) यांसारखे तज्ञ मार्गदर्शन करत आहेत.

हा कार्यक्रम उद्देश, ब्रँड पोझिशनिंग आणि सर्जनशील उत्कृष्टता यांवर आधारित सखोल कार्यशाळा, केस स्टडीज आणि सद्गुरू यांच्या मार्गदर्शनातून ब्रँड व्यवस्थापनाचा गाभा समजून घेण्याची संधी देतो. ईशा योगा सेंटरच्या ऊर्जायुक्त वातावरणात सहभागी होणाऱ्यांना प्रभावी ब्रँड निर्मितीसाठी आवश्यक दृष्टी आणि साधने दिली जातात.

सद्गुरू अकॅडमीबद्दल माहिती

सदगुरू यांनी स्थापन केलेली सद्गुरू अकॅडमी ही व्यवसाय नेते आणि संस्थांसाठी परिवर्तनशील नेतृत्व व व्यावसायिक विकास कार्यक्रम उपलब्ध करून देते. पारंपरिक योगिक ज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन दृष्टीकोन यांचा संगम घडवून ती उद्देशपूर्ण वाढ, रणनीतिक स्पष्टता आणि गतिमान बाजारपेठेत प्रभावी कामगिरी साध्य करण्यास सहाय्य करते.

अधिक माहितीसाठी संपर्क: mediarelations@ishafoundation.org

 

Follow Us