AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात एक अत्यंत मोठी चूक, रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे, या अहवामध्ये विमान अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यावर आता रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात एक अत्यंत मोठी चूक, रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ
rohit pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 9:00 PM
Share

28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात होता की घातपात? अशी चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सुरुवातीपासूनच या अपघातावर संशय व्यक्त करत आहेत. दरम्यान आज या अपघातासंदर्भातील प्राथमिक अहवाल समोर आला आहे. एएआयबीकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये अनेक महत्त्ववाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. हे विमान जमिनीला धडकण्यापूर्वी आधी झाडावर कोसळलं आणि मग जमिनिला धडकलं असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा दृश्यमानता देखील कमी होती, असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान जेव्हा हा अपघात झाला तेव्हा शेवटच्या काही मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? शेवटचं संभाषण काय होतं, याची माहिती देखील या अहवालामध्ये देण्यात आली आहे.  8 वाजून 29 मिनिटं, 25 सेंकद इथपासून ते 8 वाजून 46 मिनिट आणि 13 सेंकदांपर्यंत म्हणजे अपघातापर्यंत विमान आणि बारामती एटीसी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला? याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे. शेवटच्या काही सेंकदामध्ये पायलट ओशेट, ओशेट असं म्हटला परंतु त्याला बारामती एटीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. दरम्यान या अहवालावर आता रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्राथमिक अहवालामध्ये बारामती एअरफिल्ड हे बारामती जिल्ह्यात आहे, असा उल्लेख या प्राथमिक अहवालामध्ये करण्यात आला आहे, आता नेमक्या याच चुकीवर बोट ठेवत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

‘प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल.’  असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान एएआयबीकडून हा 22 पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे.  या अहवालामध्ये अपघातासंदर्भात कोण कोणत्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली, त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...