AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा यांच्या अपघाताच्या काही मिनिटं आधी नेमकं काय घडलं? विमानातील शेवटचा संवाद अखेर समोर, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये अपघातापूर्वी नेमका काय संवाद झाला होता? याची माहिती देखील देण्यात आली आहे.

अजितदादा यांच्या अपघाताच्या काही मिनिटं आधी नेमकं काय घडलं? विमानातील शेवटचा संवाद अखेर समोर, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
Ajit Pawar plane crashImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 7:10 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला, दरम्यान या अपघातासंदर्भातील प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. 22 पानांचा हा प्राथमिक अहवाल आहे. त्यामध्ये या अपघातासंदर्भात कोण कोणत्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली, त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल एएआयबीकडून देण्यात आला आहे.

दरम्यान अजित पवार यांचा ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी दृश्यमानता कमी होती, असं या प्राथमिक अहवालामध्ये म्हटलं आहे. तसेच डेटा रिकव्हर करण्यात यश आल्याचा दावा देखील या अहवालात करण्यात आला आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो या अपघातासंदर्भात जे पुरावे मिळाले त्यावरून निष्कर्ष काढण्यात आले, असं या अहवालात म्हटलं आहे.

या रिपोर्टमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, अपघात घडण्यापूर्वी शेवटचं संभाषण नेमकं काय झालं होतं? या संभाषणासंदर्भातील डिटेल्स या अहवालामध्ये देण्यात आली आहे. 8 वाजून 29 मिनिटं, 25 सेंकद इथपासून ते 8 वाजून 46 मिनिट आणि 13 सेंकदांपर्यंत म्हणजे अपघातापर्यंत विमान आणि बारामती एटीसी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला? याची सेकंदा -सेकंदाची माहिती या अहवामामध्ये नमूद करण्यात आली आहे. शेवटचा सवांद हा 8 वाजून 46 मिनिट आणि 13 सेंकदाने झाला, ज्यामध्ये पायलट ओशेट, ओशेट असं म्हणत आहे, मात्र त्याला त्यानंतर बारामती एटीसीकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये, हाच तो शेवटचा सवांद आहे.

दरम्यान या अहवालामध्ये अजूनही काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.  हे विमान हवेत घिरट्या घालत होतं, त्यानंतर ते जमिनीला धडकलं आणि मोठा स्फोट झाला अशी माहिती समोर आली होती, मात्र या रिपोर्टमधून आता नवीन माहिती समोर आली आहे. हे विमान जमिनीला धडकण्यापूर्वी एका झाडावर कोसळलं आणि त्यानंतर ते जमिनीला धडकलं अशी माहिती आता समोर आली आहे. तसेच विमानातील शेवटचा संवाद देखील समोर आला आहे. हा प्राथमिक अहवाल आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...