NEET चा पेपर फुटल्याचा संशय नेमका कधी आला, आतापर्यंत तपासात काय झाले ?

मेडिकलसाठीची नीटची परीक्षा 12 मे ची रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नीटचा पेपर फुटल्याचे कळल्यानंतर सर्वत खळबळ उडाली आहे. हे प्रकरण कसे उघड झाले आणि आतापर्यंतच्या तपास काय काय झाले हे पाहूयात...

NEET चा पेपर फुटल्याचा संशय नेमका कधी आला, आतापर्यंत तपासात काय झाले ?
NEET Exam Cancelled 2026
| Updated on: May 12, 2026 | 4:58 PM

नॅशनल टेस्टींग एजन्सीने (NTA) मंगळवारी 12 मे ची NEET-UG 2026 परीक्षा रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांचा अहवाल आल्यानंतर एनटीएने सध्याच्या स्थितीत परीक्षा प्रक्रिया जारी ठेवणे योग्य होणार नाही असे ठरवत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. नीट ( NEET) परीक्षा भारतात मेडिकल क्षेत्रात करियर बनवण्यासाठीची सर्वात मोठी पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेला रद्द केल्याने 22 लाख विद्यार्थ्यांना मन:स्ताप भोगावा लागला आहे. नवीन परीक्षांच्या तारखा आणि एडमिट कार्ड संबंधीचे नवे वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. या प्रकरणात नेमके पेपर फुटल्याचा संयश कधी आणि कसा आला, त्यानंतर तपासात काय पुढे आले हे पाहूयात…..

असे प्रकरण उघडकीस आले ?

NEET-2026 पेपरमधील 180 पैकी सुमारे 125 प्रश्न हे सराव प्रश्नपत्रिकेशी ( गेस पेपर )  मिळते जुळेत निघाले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि काही तरी गडबडी झाल्याचा संशय आल्याने तपास सुरु करण्याच आला. हे प्रकरण केरळ पासून सुरु झाले आणि राजस्थानच्या सीकरपर्यंत पोहचले. यात गेस पेपरमधील फिजिक्स आणि बायोलॉजीचे खूपसारे प्रश्न नीट परीक्षा प्रश्नपत्रिकेसारखे आले होते.

2 मे रोजी हॉस्टेल संचालकांना सापडला पेपर

माहितीनुसार हा पेपर केरळातील एमबीबीएसचा ( MBBS ) अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सीकरमधील त्यांच्या वडीलांना पाठवला होता. या विद्यार्थ्याचे वडील सीकरमध्ये एक पीजी हॉस्टल चालवतात. २ मे रोजी त्याने वडीलांना मोबाईलवर गेस पेपर पाठवला आणि सांगितले की हा पेपर सीकरमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका मित्राने पाठवला आहे. त्यांनी रात्री पेपर पाहिला नाही आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेच्या आधी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा संपल्यानंतर त्यांना संशय आला आणि ते एका कोचिंग संस्थेच्या शिक्षकाकडे पोहचले. जेव्हा गेस पेपर दाखवला तेव्हा कळले की अनेक प्रश्न नीटच्या पेपरपैकी होते.

परीक्षेच्या दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार

3 मेच्या परीक्षेच्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी सीकरच्या उद्योग नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पेपर लीकच्या तक्रारीकडे गंभीरतेने पाहिले गेले नाही. नंतर विद्यार्थ्यांनी पुराव्यांसह एनटीएला ईमेल केला, त्यानंतर तपास यंत्रणा सक्रीय झाल्या. सुरुवातीला एनटीएच्या स्थानिक को-ऑर्डिनेटरने कोणती गडबडीच्या तक्रारीचा इन्कार केला.

NTA ला 7 मे रोजी मिळाली तक्रार, 8 मे तपास सुरु

NTA ने 10 मे रोजी अधिकृतपणे माहिती देताना तपास सुरु असल्याचे सांगितले. मात्र, तेव्हा परीक्षेच्या निर्णयासंदर्भात कोणताही निर्णय आणि टिप्पणी करण्यास नकार दिला होता. तेव्हा सांगितले की गेली की नॅशनल टेस्टिंग एजन्सीला परीक्षेच्या चार दिवसांनी 7 मेच्या रात्री उशारा तक्रार मिळाली. 8 मे 2026 च्या सकाळी या इनपुटला स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कारवाईसाठी केंद्रीय एजन्सींना पाठवण्यात आले.या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे

10 मे रोजी राजस्थान SOG ने दिली माहिती

रविवारी (10 मे) राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे एडीजी विशाल बन्सल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. त्याच दरम्यान, त्यांनी सांगितले की 410 प्रश्नांचा गेस पेपरची चौकशी सुरु आहे. एसओजीच्या टीमनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडून काढण्यासाठी राजस्थानच्या कोचिंग हब सीकर आणि उत्तराखंड येथील डेहराडून सह अनेक ठिकाणांवर छापे मारले आणि फील्ड चौकशी केली आहे. या सर्क्युलेट केलेल्या सामग्रीचा मुख्य परीक्षा पत्रिकेशी थेट संबंध आहे का ? याचा तपास आता अधिकारी करत आहेत.

 

Follow Us