Dhruv Rathee: ध्रुव राठी हाजरी हो… प्रसिद्ध युट्यूबरच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे समन्स, प्रकरण तरी काय?

Dhruv Rathee Summons : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला दिल्ली न्यायालयाने एका अवमान प्रकरणात समन्स बजावले आहे. 2018 मधील हे प्रकरण आहे. विकास सांकृत्यायन यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Dhruv Rathee: ध्रुव राठी हाजरी हो... प्रसिद्ध युट्यूबरच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचे समन्स, प्रकरण तरी काय?
ध्रुव राठी याला न्यायालयाचे समन्स
| Updated on: Oct 15, 2026 | 7:08 AM

Delhi Saket Court summons Dhruv Rathee: प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली येथील साकेत न्यायालयाने 2018 पासून प्रलंबित फौजदारी मानहानी प्रकरणात राठी यांच्याविरोधात नवीन समन बजावले. विकास सांस्कृत्यायन (विकास पांडे) यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायदंडाधिकारी राहुल जैन यांनी प्रकरणात समन्स बजावण्याचे आदेश दिले. हे प्रकरण आठ वर्षांपूर्वीचे आहे. ध्रुव राठी यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले होते. तर बंगळुरू येथे त्यांनी CJP च्या आंदोलनातही सहभाग नोंदवला होता.

हे प्रकरण तरी काय?

Loading...

ध्रुव राठी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर भाजप आयटी सेल पार्ट 2 या व्हिडिओवरून वाद झाला होता. या व्हिडिओत आपल्याविरुद्ध खोटे आणि तर्कहिन आरोप केल्याचे विकास पांडे यांचे म्हणणे आहे. तर याच व्हिडिओत आपण भाजप आयटी सेलशी संबंधित असल्याचा आणि त्यापोटी 50 लाखांची ऑफर मिळल्याचा ध्रुव राठी यांचा आरोप खोटा असल्याचे पांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

समन्स बजावण्यास परवानगी

तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, ध्रुव राठी हे सध्या ऑस्ट्रियामध्ये राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना समन्स बजावण्यात अडचण येत होती. आता ते गुरूग्राम येथील सेक्टर -56 मध्ये राहत आहेत. त्यामुळे कोर्टाने या नवीन पत्त्यावर त्यांना समन्स जारी करण्याचे निर्देश दिले. समन्स तात्काळ बजवण्यासाठी दस्ती समन्स देण्यास मंजूरी दिली.

10 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठी यांना राहत्या घरातून सकाळी 8 वाजता ताब्यात घेतले होते. पोलिसांचे हे पथक शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांच्या घराबाहेर होते. सकाळी साध्या वेशातील 50 पोलिसांच्या पथकाने त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्याच्या आईने दरवाजा उघडला. पोलिसांनी आत प्रवेश करत त्याला ताब्यात घेतले. राठी यांचे गुरुग्राममधील सेक्टर-46 मध्ये घर आहे. केंद्रीय विहार येथील घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

त्यानंतर त्यांनी आरोप केला होता की, साध्या वेषातील काही लोकांनी आपल्या घरातून अपहरण केले. त्यांना विविध पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर आपण भारतीय नागरीक असून पासपोर्ट असल्याचे राठी यांनी स्पष्ट केले. निवडणुकांमधील कथित गडबड आणि SIR प्रक्रियेविरोधात आपण आंदोलनात सहभागी झाल्याचे राठी यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us