पंजाबमध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांकडून भाजप आमदाराला मारहाण, कपडे फाडत काळेही फासले

| Updated on: Mar 28, 2021 | 1:12 AM

4 महिने उलटूनही सरकारने अद्याप मागण्या मान्य न केल्यानं शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. याचे पडसाद ठिकठिकाणी दिसत आहेत.

पंजाबमध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांकडून भाजप आमदाराला मारहाण, कपडे फाडत काळेही फासले
Follow us on

चंदीगड : केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरुच आहे. 4 महिने उलटूनही सरकारने अद्याप मागण्या मान्य न केल्यानं शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. याचे पडसाद ठिकठिकाणी दिसत आहेत. शनिवारी (27 मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजप आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजप आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासलंय (Farmers beat BJP MLA in Malot Panjab on new farm law issue).

अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर काढले. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजप आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र, ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजप कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं.

शेतकऱ्यांनी आमदाराचे कपडेही फाडले

भाजप आमदाराच्या अंगावर शाई फेकल्यानंतर पोलीस आणि भाजप कार्यकर्ता त्यांना एका दुकानात घेऊन गेले. मात्र, नंतर आमदार नारंग दुकानाबाहेर आल्यावर शेतकऱ्यांनी कथितपणे त्यांच्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांनी या आमदाराचे कपडेही फाडले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यात पोलीस नारंग यांचा शेतकऱ्यांपासून चबाव करताना दिसत आहे. या व्हिडीओत शेतकरी आमदाराला शिव्या देताना आणि मारहाण करतानाही दिसत आहेत. याशिवाय या संतप्त शेतकऱ्यांनी भाजप कार्यालयातील भाजपचे झेंडही जाळले.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी भाजप आमदारासोबत इतर दोन भाजप नेत्यांनाही मारहाण केली. त्यानंतर पोलीस पुन्हा भाजप नेत्यांना एका दुकानात घेऊन गेले. काही वेळेने पोलिसांनी त्यांना दुकानाच्या मागच्या दरवाजाने बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी पोहचवलं. या धक्काबुक्कीत एका पोलीस अधिकाऱ्यालाही सौम्य जखम झाल्याचं सांगितलं जातंय. हा सर्व प्रकार जवळपास 1 तास सुरु होता.

हेही वाचा :

कृषी कायदे, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर उपोषण, नाना पटोले, अनेक मंत्रीही उपोषणाला बसणार

Farmer Protest : 26 मार्च रोजी शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, 19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिन

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटीश संसदेत चर्चा, भारत सरकारकडून तीव्र विरोध

व्हिडीओ पाहा :

Farmers beat BJP MLA in Malot Panjab on new farm law issue