Farmer Protest : 26 मार्च रोजी शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, 19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिन

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मार्च रोजी 4 महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

Farmer Protest : 26 मार्च रोजी शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, 19 मार्चला 'मंडी बचाओ-खेची बचाओ' दिन
farmers-protest-photo

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मार्च रोजी 4 महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकरी नेते बूटा सिंह बुर्जगिल यांनी सांगितलं की, 15 मार्चला शेतकरी आणि व्यापारी संघटना मिळून पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि रेल्वेच्या खासगीकरणा विरोधात आंदोलन करतील.(Call for Bharat Bandh on March 26 by farmers’ organizations)

आम्ही 26 मार्चला शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण होत असल्यामुळे देशभरात भारत बंद आंदोलन केलं जाईल. हा बंद अत्यंत शांततेत पार पडेल, असा दावा बूटा सिंह बुर्जगिल यांनी केला आहे.

19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिन

शेतकरी संघटना 19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिवस पाळतील असंही सांगण्यात आलं आहे. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनी शहीद दिवस साजरा करण्याचा निर्णयही शेतकरी संघटनांनी घेतला आहे. त्याचबरोबर 28 मार्चला असलेल्या होळीमध्ये नव्या शेतकरी कायद्यांच्या प्रति जाळण्यात येतील असंही शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलंय.

राकेश टिकैत 13 मार्च रोजी कोलकाता दौऱ्यावर

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत 13 मार्च रोजी कोलकाता दौऱ्यावर असणार आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर टिकैत यांच्या कोलकाता दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत पश्चिम बंगालमधील शेतकरी संघटनांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, टिकैत कोणत्याही पक्षाला आपला पाठिंबा दर्शवणार नाहीत, असं सांगण्यात आलं आहे.

देशातील शेतकरी भाजपच्या नितीमुळे त्रस्त आहेत, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. 13 मार्च रोजी कोलकात्यातून निर्णायक लढाईचं बिगूल वाजवलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला ते भाजपचा पराभव करण्याचं आवाहन करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Delhi Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलन चिघळलं, दिल्लीत काय काय बंद?

Farmers protest | शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार?, 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा

Call for Bharat Bandh on March 26 by farmers’ organizations

Published On - 9:39 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI