हरियाणात 10,000 शेतकऱ्यांचं शक्तिप्रदर्शन, अखेर भाजप सरकारनं 350 शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले

| Updated on: May 26, 2021 | 3:52 AM

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हिसार शहराच्या क्रांतिमान पार्कमध्ये 10,000 हून अधिक शेतकऱ्यांची विशाल सभा झाली.

हरियाणात 10,000 शेतकऱ्यांचं शक्तिप्रदर्शन, अखेर भाजप सरकारनं 350 शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले
Follow us on

नवी दिल्ली : हरियाणाच्या शेतकऱ्यांनी 24 मे रोजी भाजपच्या सरकारविरुद्ध एक मोठा विजय मिळवला. त्या दिवशी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हिसार शहराच्या क्रांतिमान पार्कमध्ये 10,000 हून अधिक शेतकऱ्यांची विशाल सभा झाली. राज्य सरकारने त्या दिवशी आंदोलन दडपण्यासाठी 3000 हून अधिक पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडो तैनात केले होते. पण हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर्स, ट्रॉली, टेम्पो, गाड्या व इतर वाहनांनी जमताच या दमन यंत्रणेचे काही एक चालले नाही (Farmers Protest in Hariyana thousands of farmer gathered against police action).

16 मे रोजी हिसार येथे भाजपचे मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांद्या फोडल्या. शेकडो शेतकरी गंभीररीत्या जखमी झाले. त्यावर कडी म्हणजे पोलीस केसेस होणार नाहीत असे आधी मान्य करूनही दोन दिवसांनी भाजप सरकारने 350 शेतकऱ्यांवर कलम 307 (खुनाचा प्रयत्न) व इतर गंभीर कलमे लावून खटले भरले, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

घेराव होण्याआधीच चर्चेचं निमंत्रण, तब्बल 4 तास चर्चा

24 मे रोजी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचे ठरवले होते. पण घेराव सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने एसकेएमला चर्चेचे आमंत्रण दिले. विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांशी तब्बल 4 तास चर्चा झाली.

शेवटी 350 शेतकऱ्यांवरील 16 मेचे व त्यापूर्वीचे सर्व पोलीस खटले मागे घेण्याचे, 16 मे रोजी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ज्या अनेक वाहनांची नासधूस केली होती त्यांची नुकसानभरपाई देण्याचे आणि रामचंद्र नावाचा जो शेतकरी 24 मेच्या आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे प्रशासनाला मान्य करावे लागले. 16 मेच्या पोलीस दडपशाहीबद्दल आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली. हा शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय असल्याचं मत शेतकरी संघटनेने व्यक्त केलंय.

संयुक्त किसान मोर्चाच्या ज्या नेत्यांनी या विशाल सभेस संबोधित केले आणि प्रशासनासोबतच्या चर्चेत भाग घेतला त्यात बलबीर सिंग राजेवाल, जोगिंदर सिंग उग्राहान, गुरनाम सिंग चडुनी, राकेश टिकैत, डॉ. अशोक ढवळे, जगजीत सिंग दलेवाल, युधवीर सिंग, इंदरजीत सिंग, सुरेंद्र सिंग, पी. कृष्ण प्रसाद, मेजर सिंग पुनेवाल, फूलसिंग शेवकंद, सुमीत यांचा समावेश होता. हिसारच्या विशाल सभेत जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या मोदी सरकारवरही टीकेची झोड उठविण्यात आली आणि 26 मेचे देशव्यापी आंदोलन प्रचंड यशस्वी करण्याची हाक देण्यात आली.

हेही वाचा :

Farmers Protest: 6 महिने होऊनही मागण्या मान्य नाही, शेतकरी 26 मे रोजी काळा दिवस पाळणार, काँग्रेससह 12 विरोधी पक्षांचा पाठिंबा

शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अश्लील मेसेज, जीवे मारण्याचे धमकीचे फोन

Farmers Protest : कृषी कायद्याविरोधात संघर्ष सुरूच, मुख्यमंत्री खट्टर यांच्याविरोधातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अनेकजण जखमी

व्हिडीओ पाहा :

Farmers Protest in Hariyana thousands of farmer gathered against police action