Farmers Protest : कृषी कायद्याविरोधात संघर्ष सुरूच, मुख्यमंत्री खट्टर यांच्याविरोधातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अनेकजण जखमी

हरियाणात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Farmers Protest : कृषी कायद्याविरोधात संघर्ष सुरूच, मुख्यमंत्री खट्टर यांच्याविरोधातील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, अनेकजण जखमी
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 4:25 PM

चंदीगढ : देशभरात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. हरियाणात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झालेत (Police Lathi charge and use of tear gas against Farmers in Hariyana).

मुख्यमंत्री खट्टर हिसारमध्ये एका कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी शेतकरीही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केलं (Protest Against CM Khattar). पोलिसांनी बॅरिकेटिंग करत शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांच्या आक्रमकपणासमोर याचा काहीही उपयोग झाला नाही. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशभरातील शेतकरी सातत्याने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. सरकारने तात्काळ कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचं दिसतंय. मागील अनेक महिन्यांपासून याच मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. या काळात सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र जोपर्यंत सरकार कायदे रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार यावर शेतकरी ठाम आहेत.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हिसारमध्ये पोहचल्यानंतर शेतकरीही तेथे पोहचले. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन सुरु केलं. याआधी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत पानीपतमध्ये गेले होते. तेथेही त्यांनी गुरु तेग बहादुर संजीवनी रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्या ठिकाणी 500 बेड्सची व्यवस्था करण्यात आलीय. तसेच थेट पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचा :

‘मी पैशांसाठी पगडी घालत नाही’, आयपीएलचा स्टार खेळाडू हरप्रीतची अक्षय कुमारला चपराक

PHOTOS: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या हल्ल्याविरोधात शेतकरी रस्त्यावर, दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवर ट्रॅफिक जाम

पंजाबमध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांकडून भाजप आमदाराला मारहाण, कपडे फाडत काळेही फासले

व्हिडीओ पाहा :

Police Lathi charge and use of tear gas against Farmers in Hariyana

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.