FASTag | वाहनचालकांना दिलासा, टोलनाक्यांवरील FASTag साठी मुदतवाढ

| Updated on: Dec 31, 2020 | 2:23 PM

फास्‍टॅग बनवण्याची शेवटची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

FASTag | वाहनचालकांना दिलासा, टोलनाक्यांवरील FASTag साठी मुदतवाढ
Follow us on

नवी दिल्ली : रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्‍टॅग (FASTag) अनिवार्य केल्यानंतर (FASTag To Be Mandatory For All Vehicles) आता फास्‍टॅग बनवण्याची शेवटची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी सरकारने 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने आता ती मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे (FASTag To Be Mandatory For All Vehicles).

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वर्तमान काळात राष्ट्रीय महामार्गांवरुन जे टोल मिळतं त्यापैकी 80 टक्के टोल हा फास्‍टॅगच्या मदतीने मिळते.

1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक असेल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी 24 डिसेंबरला केली होती.

फास्टॅग म्हणजे काय?

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.

फास्टॅग कुठे खरेदी कराल? कसे रिचार्ज कराल?

NHAI आणि 22 वेगवेगळ्या बँकेतून तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. त्याशिवाय Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग NHAI प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल तर चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ NEFT/नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर Paytm वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते (FASTag To Be Mandatory For All Vehicles).

किती रिचार्ज करणार? वैधता किती?

तुमच्या फास्टॅग अकाऊंटमध्ये तुम्हाला किमान 100 रुपये ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बँक त्यांच्या हिशोबाने रक्कम कट करेल. जर तुम्ही 200 रुपयांत एखाद्या बँकेतून फास्टॅग खरेदी केला तर तुम्हाला करही भरावा लागणार आहे. फास्टॅगची वैधता नसते.

फास्टटॅगशिवाय मार्गिकेत घुसल्यास?

तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला कोणीच मार्शल लाईनमध्ये घुसू देणार नाही. जर तुम्ही चुकून फास्टॅगच्या मार्गिकेत घुसल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

FASTag To Be Mandatory For All Vehicles

संबंधित बातम्या :

1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांना FASTag बंधनकारक, मोदी सरकारचा मोठा निर्णय

FASTag बाबत शंका असेल, तर हे नक्की वाचा…

शिथिलता येताच मुंबईकर सुटले, ‘बेस्ट’साठी गर्दी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी