भयानक अपघात… कारचा चकनाचूर… कॅबिनेट मंत्र्याच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

झारखंडमधील जमशेदपूर येथे भीषण अपघात झाला असून, यात ग्रामीण विकास मंत्री दीपिका पांडे यांच्या मुलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोमुहानी परिसरात कार आणि ट्रकची जोरदार धडक होऊन कारचा चकनाचूर झाला. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

भयानक अपघात... कारचा चकनाचूर... कॅबिनेट मंत्र्याच्या मुलीसह चौघांचा मृत्यू
Jharkhand accident
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 11:58 AM

झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यात दोमुहानी परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये काल रात्री जोरदार धडक झाली. या धडकेत कारचा चकनाचूर झाला असून एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्री दीपिका पांडे यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री हा अंगावर शहारे आणणारा अपघात झाला. हा अपघात अत्यंत भयानक होता. अपघातात कारचे छतच उडाले आहे.

दोमुहानीजवळ कार आणि ट्रक दरम्यान जोरदार धडक झाली. ही टक्कर अत्यंत जोरदार होती. त्यामुळे कारचा चकनाचूर झाला. या घटनेमुळे घटनास्थळी एकच धावपळ उडाली. आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. या अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याच्या मुलीचाही समावेश आहे.

पोलिसांची चौकशी सुरू

झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्री दीपिका पांडे सिंह यांच्या मुलगी या कारमधून प्रवास करत होत्या. त्यांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. तसे अपघाताशी संबंधित सर्व माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच झारखंडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राज्यातील बड्या नेत्यांनी यावर दु:ख व्यक्त केलं आहे. झारखंडचे आरोग्य मंत्री डॉ. इरफान अन्सारी यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दु:ख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत धक्कादायक घटना आहे, असं अन्सारी यांनी म्हटलं आहे.

दोमुहानी येथील अपघाताने सर्वच हादरून गेले आहे. रात्रीची वेळ असल्याने कारची ट्रकला जोरदार धडक बसल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात संपूर्ण कारचा चकनाचूर झाला. कारचं छत उडालं. यावरून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येत आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. अपघात कशामुळे झाला? कोणत्या परिस्थिती झाला? याची पोलीस माहिती घेत आहेत. अपघाताच्या प्रत्येक बाजूने पोलीस चौकशी करत आहेत.

दीपिका यांचा आंदोलनात पुढाकार

दरम्यान, रांचीमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी मंत्री दीपिका पांडे सिंह यांनी सरकारचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच समर्थन केलं होतं. विद्यार्थ्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांच्या अधिकाराचा सन्मान केला पाहिजे, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांवर जो लाठीमार झाला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या त्यालाही त्यांनी विरोध केला होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us