AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक

इटावा जिल्ह्यात सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. या एक्सप्रेसच्या तब्बल 3 डब्ब्यांना भीषण आग लागली आहे. या आगीचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर आग किती भीषण होती याचा अंदाज येईल.

दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Nov 15, 2023 | 7:14 PM
Share

इटावा (उत्तर प्रदेश) | 15 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे.  इटावा जिल्ह्यात सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. या एक्सप्रेसच्या तब्बल 3 डब्ब्यांना भीषण आग लागली आहे. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही. पण आगीचे धक्कादायक व्हिडीओ समोर आली आहे. आगीच्या व्हिडीओमधून आग किती भीषण लागली आहे याची प्रचिती येताना दिसत आहे. सध्या घटनास्थळी प्रशासन दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इटावा येथून ही गाडी नवी दिल्लीसाठी रवाना झाली होती. या दरम्यान ट्रेनला भीषण आग लागली. या आगीत जनरल डब्बा पूर्णपणे जळून खाक झालाय. ट्रेनमधून धूर निघत असल्याचं समजस्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी ट्रेनखाली उड्या मारुन आपला जीव वाचवला.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा रेल्वेचा वेग हा 20 ते 30 किमीच्या दरम्यान होता. पण डब्ब्यात क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सराय भूपत स्टेशनला ट्रेन जात असताना स्टेशन मास्तरला स्लिपर कोचमध्ये धूर पाहिला होता. स्टेशन मास्तरवे वॉकी टॉकीच्या मदतीने ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डला सूचना केली होती. त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि पावर ऑफ केलं गेलं. यानंतर स्लिपर कोचमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.