इराणकडून भारतीय जहाजांवर गोळीबार, भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये घेतला सर्वात मोठा निर्णय, आता थेट…

मोठी बातमी समोर आली आहे, इराणकडून भारतीय जहाजांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती, त्यानंतर आता भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे, सरकारे मोठा निर्णय घेतला आहे.

इराणकडून भारतीय जहाजांवर गोळीबार, भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये घेतला सर्वात मोठा निर्णय, आता थेट...
indian ship
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 7:11 PM

इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविरामानंतर देखील संघर्ष सुरूच आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अमेरिकेनं घेतलेल्या भूमिकेमुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज दुसऱ्याच दिवशी बंद केला. या दरम्यान एक मोठी घटना घडली, ती म्हणजे इराणकडून दोन भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आला. ही जहाजं तेल घेऊन स्ट्रेट ऑफ होर्मूज पार करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र अचानक इराणकडून गोळीबार झाल्यानं या जहाजांना यूटर्न घ्यावा लागला. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने 20 जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून माघारी पाठवले आहे, त्यात दोन भारतीय जहाजांचा देखील समावेश होता.

दरम्यान इराणकडून भारतीय जहाजांवर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. शनिवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय झेंडे असलेल्या जहाजांना तब्बल 12,980 कोटी रुपयांच्या गॅरंटी सोबत देशांतर्गत विमा सुविधा देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. सध्या मध्य पूर्वेत प्रचंड तणाव पहायला मिळत आहे, याचा परिणाम म्हणून इंश्योरंसच्या प्रीमियममध्ये देखील वाढ झाली आहे, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या नव्या योजनेला ‘भारत मॅरीटाइम इंशोरंस पूल’ (बीएमआई पूल) असं नाव देण्यात आला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतीय झेंडा असलेल्या त्या सर्व जहाजांना स्वस्तात विमा उपलब्ध करून देण्याचा आहे, जे जहाज कोणत्याही देशामधून भारतीय बंदरावर सामानाची वाहतूक करण्याचं काम करतात. याचा या जहाजांना मोठा फायदा होणार आहे. भारतीय जहाजांना स्वस्तात विमा उपलब्द होणार आहे.

 

Follow Us