पाच हजार लग्न सोहळे, राजधानी दिल्ली ठप्प!

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत काल (19 नोव्हेंबर) जवळपास 5000 लग्न सोहळे होते. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीसाठी ‘प्रसिद्ध’ असलेल्या दिल्लीत कालही अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. “दिल्ली पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सोशल मीडियावरुन दिल्लीकरांना प्रत्येक रस्त्याची आणि वाहतूक कोंडीची माहिती देत होते. जवळपास 5000 लग्न सोहळे दिल्लीत होते. त्यामुळे शहरात जवळपास एक …

पाच हजार लग्न सोहळे, राजधानी दिल्ली ठप्प!

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत काल (19 नोव्हेंबर) जवळपास 5000 लग्न सोहळे होते. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडीसाठी ‘प्रसिद्ध’ असलेल्या दिल्लीत कालही अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. “दिल्ली पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सोशल मीडियावरुन दिल्लीकरांना प्रत्येक रस्त्याची आणि वाहतूक कोंडीची माहिती देत होते. जवळपास 5000 लग्न सोहळे दिल्लीत होते. त्यामुळे शहरात जवळपास एक हजार जवानही तैनात करण्यात आले होते”, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त आलोक कुमार दिली.

शहरातील रहदारीची गैरसोय झाल्यामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका नागरिकांना बसला. अनेकजण वेळेवर आपल्या घरी पोहोचू शकले नाहीत. शिवाय, रस्त्यावर गाड्यांची रांग लागली होती. काही गाड्या तर तासन् तास वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. अनेकजण तर लग्न सोहळ्यांनाही वाहतूक कोंडीमुळे वेळेवर पोहोचू शकले नाहीत.

दरम्यान. वाहतूक पोलिसांनीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांना गाडी व्यवस्थित चालवण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक चौकात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

लग्नामुळे महरौली, ग्रीन पार्क, मालवीय नगर, हौजखास, अरविंदो मार्ग, नवी दिल्लीसह बऱ्याच ठिकाणी लग्नामुळे हॉटेलबाहेर लोकांची गर्दी होती, तसेच गाड्यांची संख्याही वाढली होती. तर छत्तरपूर, महरौली- बदरपूर रोड, एनएच-८, कापसहेडा विभागात वाहनांच्या रांगा लागल्या होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *