Hariyana Accident : हरियाणात सैन्यभरतीसाठी रनिंग करत होते तरुण, मात्र एका क्षणात स्वप्नांचा झाला चक्काचूर, वाचा नेमके काय घडले ?

| Updated on: Jul 04, 2022 | 2:20 AM

कारच्या धडकेने पाच तरुण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक कारसह घटनास्थळावरून पळून गेला. पाच जखमी तरुणांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी पीडितेचा भाऊ लोकेश आणि त्याचा साथीदार विवेक यांना मृत घोषित केले.

Hariyana Accident : हरियाणात सैन्यभरतीसाठी रनिंग करत होते तरुण, मात्र एका क्षणात स्वप्नांचा झाला चक्काचूर, वाचा नेमके काय घडले ?
यमुनानगरमध्ये कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात
Image Credit source: tv9
Follow us on

पलवल : सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पहाटे धावण्याचा सराव करणाऱ्या पाच तरुणां (Five Youths)ना कारने उडवल्याची दुर्दैवी घटना हरियाणातील पलवल जिल्ह्यात घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर दोन तरुण गंभीर जखमी (Injured) झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चांदघाट पोलीस ठाण्यांतर्गत केजीपी (कुंडली मानेसर पलवल) रस्त्यावर सकाळी ही घटना घडली.

पेलक गावातील रहिवासी तोताराम यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी पहाटे पाच वाजता पेलक गावातील रहिवासी तोताराम सुजवडी गावाजवळून जाणाऱ्या केजीपी मार्गाच्या बाजूला फिरत होते. केजीपी रोडवर पीडितेचा भाऊ लोकेश, त्याचे साथीदार विवेक, सौरभ, सनी आणि हरीश हे पेलक गावातील रहिवासी सैन्यभरतीसाठी तयारी करत होते. त्यासाठी ते नेहमीप्रमाणे पहाटे धावण्याचा सराव करत होते. त्याचवेळी पलवल येथून भरधाव वेगाने येणाऱ्या अल्टो कारने या तरुणांना जोरदार धडक दिली, असे डीएसपी यशपाल खटाना यांनी सांगितले.

गावात तणावाची स्थिती

कारच्या धडकेने पाच तरुण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक कारसह घटनास्थळावरून पळून गेला. पाच जखमी तरुणांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी पीडितेचा भाऊ लोकेश आणि त्याचा साथीदार विवेक यांना मृत घोषित केले. त्याचवेळी जखमी सौरभ, सनी आणि हरीश यांना प्राथमिक उपचारानंतर उच्च केंद्रात रेफर करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. (Five youths were crushed by a speeding car in Haryana, three of them died on the spot)

हे सुद्धा वाचा