AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 दिवस एकाच शेतात गाय दिवसरात्र मारत होती चकरा, लोकांची प्रचंड गर्दी, पुजाही सुरू झाली, अखेर 8 व्या दिवशी हादरवणारं रहस्य समोर

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतामध्ये एक गाय दिवसरात्र चकरा मारत होती. तब्बल 7 दिवस हा प्रकार सुरू होता, लोकांनी या गायीला पहाण्यासाठी प्रचंड गर्दी देखील केली होती. अखेर आठवड्या दिवशी या रहस्याचा उलगडा झाला आहे.

7 दिवस एकाच शेतात गाय  दिवसरात्र मारत होती चकरा, लोकांची प्रचंड गर्दी, पुजाही सुरू झाली, अखेर 8 व्या दिवशी हादरवणारं रहस्य समोर
आठव्या दिवशी गायीचं रहस्य समोर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 4:01 PM
Share

एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या सात दिवसांपासून एक गाय सातत्याने एकाच शेतात गोल-गोल चकरा मारत होती. ज्या दिवसापासून या गायीने शेतात चकरा मारण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ही गाय थांबून थांबून एकाच शेतात रात्रंदिवस चकरा मारत होती. त्यामुळे ही गाय पंचक्रोशीमध्ये चर्चेचा विषय ठरली. ही गाय पाहाण्यासाठी दूरवरून लोक या ठिकाणी येऊ लागले, लोकांनी या गायीची पूजा करण्यास देखील सुरुवात केली. मात्र गर्दी वाढतच गेल्यानं अखेर 8 दिवशी या ठिकाणी पोलिसांची एन्ट्री झाली, आणि त्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. या गायीने गेल्या आठड्यात शुक्रवारपासून शेतात चकरा मारण्यास सुरुवात केली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना श्रावस्ती जिल्ह्यातल्या बसभरिया पुरैना गावामध्ये घडली आहे. ही गाय गेल्या सात दिवसांपासून सातत्याने एकाच शेतात चकरा मारत होती. त्यामुळे ही गाय चांगलीच चर्चेमध्ये आली, या गायीला पहाण्यासाठी दूरवरून लोक येऊ लागले, शेतात मोठी गर्दी झाली. दरम्यान गर्दी एवढी वाढली की आठव्या दिवशी या शेतात थेट पोलीस दाखल झाले. आठव्या दिवशी पोलिसांनी ही गर्दी पांगवली, त्यानंतर ही गाय तिच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आली, लोकांनी या ठिकाणी पूजापाठ करण्यास देखील सुरुवात केली होती.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात सकाळी आकरा वाजेच्या सुमारास या गायीने या शेताच्या चकरा मारण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर थांबून -थांबून तिचं या शेतात चकरा मारणं सुरूच होतं. या गायीचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झाला, त्यानंतर गावातील अनेक लोकांनी हा एक दैवी चमत्कार असल्याचं मानून या गायीची पूजा करण्यास सुरुवात केली, तिथे प्रचंड गर्दी जमली. या शेतात नेमकं असं काय आहे? ज्यामुळे ही गाय इथे चकरा मारत आहे, अशी देखील उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली.

मात्र गर्दी वाढल्यामुळे अखेर आठव्या दिवशी या शेतात पोलीस दाखल झाले, पोलिसांनी ही गर्दी पांगवली. या गायीला तिच्या मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर या घटनेची माहिती पशु वैद्यकीय डॉक्टरांना देखील देण्यात आली. डॉक्टरांनी या गायची तपासणी केली असता, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे या गायीला हाइपोग्लाइसीमिया नावाचा आजार आहे, या आजाराची ज्या प्रण्याला लागण होते, त्यामध्ये अशी लक्षणं दिसून येतात. त्यानंतर आता या गायीवर उपचारास सुरुवात करण्यात आली आहे. ही गाय लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना आता लोकांमधून होत आहे.

Follow Us
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य