मॉर्निंग वॉक करतानाच बेशुद्ध पडले, धाडकन कोसळले, माजी उपराष्ट्रपती एम्समध्ये भरती, नेमकं काय झालं?

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत अचानक बिघडली असून मॉर्निंग वॉकला असताना ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्डिओ न्यूरो सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे चिंता वाढली आहे.

मॉर्निंग वॉक करतानाच बेशुद्ध पडले, धाडकन कोसळले, माजी उपराष्ट्रपती एम्समध्ये भरती, नेमकं काय झालं?
| Updated on: Nov 11, 2026 | 5:16 PM

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत आज सकाळी अचानक बिघडली आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना ते बेशुद्ध पडले आणि जमिनीवरच धाडकन कोसळले. त्यामुळे त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 75 वर्षीय धनखड यांना कार्डिओ न्यूरो सेंटरमध्ये भरती करण्यात आलं असून कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबत अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडले होते. काही दूर अंतर चालल्यावर ते अचानक बेशुद्ध झाले आणि धाडकन कोसळले. जमिनीवर कोसळल्यानंतर ते काही मिनिट बेशुद्धच होते. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पीसीआर वाहनाने घरी आणलं. त्यानंतर इंस्टीट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्सेस (ILBS) ची मेडिकल टीम आणि एम्सचे डॉक्टर संदीप सेठ यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केली. त्यांना तातडीची वैद्यकीय सुविधा दिली.

Loading...

फरक पडला नाही, चिंता वाढली

प्राथमिक उपचाj केल्यानतंरही धनखड यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे अधिकच चिंता वाढली. त्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यांना लागलीच कार्डियो न्यूरो सेंटरमध्ये भरती करण्यात आलं. सध्या कार्डिओलॉजी विभागाच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काहीच माहिती नाही

माजी उपराष्ट्रपती धनखड यांची प्रकृती कशी आहे? त्यांना नेमकं काय झालं? कशामुळे त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले? ते शुद्धीवर आले का? धोका टळला की नाही? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीमने काहीच माहिती दिली नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत काहीच माहिती दिली नसल्याने संभ्रम वाढला आहे. जगदीप धनखड हे देशाचे 14 वे उपराष्ट्रपती होते. ऑगस्ट 2022 ते जुलै 2025 पर्यंत ते उपराष्ट्रपती पदावर होते. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते विजनवासातच गेले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us