
अहमदाबादमध्ये १२ जून २०२५ रोजी झालेल्या विमान अपघातानंतर चार दिवसांनी एअर इंडियाच्या ११२ पायलटने अचानक रजा घेतली होती अशी माहिती उघडकीस आली होती. नागरिक उड्डाण मंत्रालयाचे राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संसदेत ही माहिती दिली. त्यांनी दुजोरा देताना सांगितले की एअर इंडिया AI- १७१ च्या अपघातानंतर सर्व फ्लीटच्या पायलटांच्या वतीने सिक लिव्हचे अर्ज वाढण्याचा प्रकार घडला होता.
फ्लाईट क्रमांक एआय-१७१ अपघातानंतर एअर इंडियाच्या पायलटनी सामुहिक सिक लीव्ह घेतल्याच्या संदर्भात भाजपाचे सदस्य जय प्रकाश यांच्या प्रश्नाला राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लेखी उत्तरात सांगितले की १६ जून रोजी एकूण ११२ पायलटनी आजारी असल्याचे माहिती दिली होती. त्यात ५१ कमांडर्स ( पी१) आणि ६१ फर्स्ट ऑफीसर ( पी २ ) सामील होते.
अपघातानंतर नागरी उड्डयन महासंचालकांनी ( डीजीसीए ) एका मेडिकल सर्क्युलरमध्ये एअरलाईन्सला सल्ला दिला होता की त्यांनी फ्लाईट क्रु आणि एअर ट्रॅफीक कंट्रोलर्सच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आरोग्यावर होणाऱ्या प्रतिकूल प्रभावांना दूर करण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरु करावा.
यावेळी राज्य मंत्र्यांनी सांगितले की, मानसिक आरोग्याच्या तपासणी संबंधी ऑपरेटर्स, एफटीओ आणि एएआयला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक सपोर्ट प्रोग्रॅम बनविण्याचा सल्ला ही दिला आहे.एअरलाईन्सने या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे.म्हणजे फ्लाईट क्रू मेंबर्स/एटीसीओना कोणत्याही समस्येला ओळखणे आणि त्याचा सामना करणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळेल.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान ( AI-171 ) धावपट्टीहून उड्डाण घेतात काही सेकंदात कोसळले होते. या एक प्रवासी वगळता सर्व २४१ प्रवाशांचा मृत्यू जाला होता. हे विमान हॉस्टेलवर कोसळल्याने तेथेही मनुष्यहानी झाली त्यामुळे मृत्यूचा आकडा २६० हून अधिक झाला. मृत्यूमध्ये ब्रिटन आणि कॅनडाचे नागरिक देखील होते.