AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या नागरिकांबद्दल…अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात पाकिस्तानची आली प्रतिक्रीया

एपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या विमानातील कोणीही वाचले नाही. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. आता या विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

भारताच्या नागरिकांबद्दल...अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात पाकिस्तानची आली प्रतिक्रीया
| Updated on: Jun 12, 2025 | 9:34 PM
Share

अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान दुपारी अहमदाबाद विमानतळापासून अवघ्या काही फर्लांगभर अंतरावरच कोसळले. टेक ऑफ घेतल्यानंतर अहमदाबाद एअरपोर्टवरुन काही मिनिटांतच बी.जे. मेडिकल कॉलेजवर कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते त्यातील बहुतांशी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. वृत्तंसस्थेनुसार केवल एक व्यक्ती या अपघातातून वाचल्याचे उघडकीस आले होते. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या अपघातात पाकिस्तानातून आता पहिली प्रतिक्रीया आलेली आहे. पाकिस्तानी माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची प्रतिक्रीया आली आहे.

एअर इंडिया विमान दुर्घटनेवर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिलावल भुट्टो यांनी ही बातमी अत्यंत दु:खदायक आहे. मी भारताच्या नागरिकांबद्दल सहवेदना व्यक्त करीत आहे. एअर इंडियाच्या विमानाचा एआय-171 अहमदाबाद विमानतळाच्या रनवे २३ वरुन टेकऑफ केल्यानंतर काही अंतरावरच दुपारी 1.39 वाजता कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठा ब्लास्ट होऊन आगीच्या ज्वालांचा गोळा आकाशात तयार झाल्याचे भयावह दृश्य दिसले.

एपीच्या रिपोर्टनुसार पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी सांगितले की विमान दुर्घटनेत कोणीही जिवीत राहीलेले नाही. यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी विमान दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांनी संवाद साधला आणि माहीती घेतली. केंद्र सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

जखमी 25 लोकांची यादी जाहीर

विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या 25 लोकांची यादी जाहीर झाली आहे. गुजरात आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी सांगितले की अहमदाबाद सिव्हील रुग्णालयाच्या विद्यार्थ्याचे हॉस्टेल, स्टाफ क्वार्टर आणि अन्य निवास क्षेत्रात विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. जखमी झालेल्या 50 लोकांना अहमदाबादच्या सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे. एअर इंडियाने परदेशी नागरिकांच्या साठी एक हॉटलाइन नंबर जारी केला आहे. एअर इंडियाने प्रवाशासाठी डेडीकेटेट प्रवासी हॉटलाइन नंबर 1800 5691 444 जारी केला आहे. परदेशी नागरिकांसाठी आम्ही आणखी एक हॉटलाईन नंबर +91 8062779200 जाहीर केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.