AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपिया येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकित एक जवान शहीद झाला आहे, तर तिघे जखमी झालेत. तसेच सीमारेषेवर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. सध्या दोन्ही बाजूने गोळीबार बंद असून सुरक्षारक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. सध्या हे ऑपरेशन पूर्ण झालं आहे. मागील रात्री शोपियाच्या […]

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या शोपिया येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकित एक जवान शहीद झाला आहे, तर तिघे जखमी झालेत. तसेच सीमारेषेवर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. सध्या दोन्ही बाजूने गोळीबार बंद असून सुरक्षारक्षकांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

सध्या हे ऑपरेशन पूर्ण झालं आहे. मागील रात्री शोपियाच्या नादिग्राम येथे दोन ते तीन दहशतवादी लपून असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, ज्यानंतर सुरक्षा दलाने या संपूर्ण परीसराला वेढा घलून शोधकार्याला सुरूवात केली. सीआरपीएफच्या 178 बटालियन, आरआर आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी एकत्र येत हे ऑपरेशन पूर्ण केले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं, तसेच एलओसीवर गोळीबारही करण्यात आला. पुंछ येथे पाकिस्तानाने मोर्टारही दागले. याच्या दोन दिवसाआधीही शोपिया येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती, ज्यात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. ही चकमक शोपियाच्या रेबन येथे झाली होती. शोपिया येथे वारंवार दहशतवादी हल्ले होत आहेत. शनिवारी दुपारी शोपिया येथे दहशतवाद्यांनी तीन तरुणांचे अपहरण करुन त्यातील एका तरुणाची हत्या केली. तर इतर दोघांना सोडून दिले. पण संध्याकाळी त्यांनी पुन्हा दोन तरुणांचे अपहरण केले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.