
कारगिल युद्ध भारताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि शौर्याचा गौरवपूर्ण अध्याय आहे. मे 1999 ते जुलै 1999 असं दोन महिने कारगिल युद्ध चाललं. पाकिस्तानने भारतावर हे युद्ध लादलं होतं. कारगिलच्या उंच शिखरांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. भारतीय सैन्याने पराक्रमाचा नवा अध्याय लिहित या पाकिस्तानी घुसखोरांना तिथून पिटाळून लावलं. या युद्धात काही शस्त्रांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज आपण त्या शस्त्रांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांनी कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सोबतच आजची शस्त्र त्यावेळच्या शस्त्रांपेक्षा किती वेगळी आहेत, हे सुद्धा पाहणार आहोत. कारगिल युद्धात भारताने विभिन्न प्रकारची शस्त्र आणि उपकरणं वापरली होती. यात तोपखाना, फायटर जेट्स आणि छोटी शस्त्र याचा वापर करण्यात आलेला. उंचावरील युद्ध क्षेत्रात अनेक आव्हान असूनही या शस्त्रांनी शत्रूचे बंकर आणि ठिकाणं नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या शस्त्रास्त्रांबद्दल जाणून घेऊया. ...