बिसलेरीचे पाणी पिण्यास घातक, FSSAI थेट दाखल करणार खटला, कंपनीने म्हटले, आमचे पाणी..
बिसलेरी कंपनी चांगलीच अडचणीत सापडली आहे. बिसलेरीचे पाणी पिण्यास योग्य नाही आणि त्यात कॅन्सर होणारी घटक असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच आता बिसलेरीकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला.

बिसलेरी हा देशातील मोठा पिण्याच्या पाण्याचा पॅकेज्ड ब्रँड आहे. जवळपास ठिकाणी आपल्याला बिसलेरीचे पाणी बघायला मिळते. मात्र, बिसलेरीचे पाणी आरोग्याला घातक असून त्या पाण्यात कॅन्सर होणारी घटक असल्याचा दावा करण्यात आला. FSSAI ने रविवारी बिसलेरीच्या विरोधात कोर्टात केस चालवण्यास मंजूरी दिली. या बाटलीबंद पाण्याचे नमूने दोनदा चाचणीत फेल झाले आहेत. याचा अर्थ बिसलेरीचे पाणी पिण्याच्या लायक नसल्याचे या तपासणीत आढळले. ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. कंपनीने यावर आक्षेप घेतला आणि दुसरी चाचणी घेण्यात आली. मात्र, तरीही पाणी असुरक्षित असल्याचे आढळले.पीएएच नावाचे कर्करोग कारक घटक देखील पाण्यात आढळले आहेत. ज्यानंतर एकच खळबळ उडाली.
ज्या उत्पादनावर लोकांनी दीर्घकाळ पूर्ण विश्वास ठेवला होता, त्या बिसलेरीत पाण्याच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कंपनीच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा एक नमुना मानवी वापरासाठी असुरक्षित असल्याचे आढळल्यानंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
त्यातच आता बिसलेरीने मोठा निर्णय घेतला. बिसलेरी पाण्याच्या सुरक्षिततेबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पाणी पिण्यास सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला. सप्टेंबर 2025 मध्ये गोवा प्लांटमधील पाण्याच्या नमुन्यांची FSSAI कडून तपासणी झाली होती. सहा नमुन्यांपैकी पाच नमुने निर्धारित मानकांनुसार योग्य मात्र एका नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा किंचित जास्त आढळले असल्याचे म्हणणे.
पुनर्तपासणी आणि स्वतंत्र प्रयोगशाळेच्या अहवालात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचा बिसलेरीचा दावा आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी स्वतंत्र तपासणीचा अहवाल FSSAI च्या पश्चिम विभागीय कार्यालयाला सादर केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पाण्याच्या गुणवत्तेसाठी उत्पादन प्रक्रियेत 10 टप्प्यांत 90 हून अधिक चाचण्या केल्या जातात. FSSAI ला सहकार्य सुरू ठेवणार असल्याचे बिसलेरीचे स्पष्टीकरण.
मिळालेल्या अहवालांनुसार, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफएसएसएआयने मोठी कारवाई केली आहे. या प्राधिकरणाने ‘बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडसह एकूण पाच खाद्य कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या कंपन्यांची खाद्य उत्पादने असुरक्षित असल्याचे किंवा निर्धारित मानकांचे पालन करत नसल्याचे आढळून आले.