टार्गेटवर एकट्या असणाऱ्या मुली,15 मुलींची विक्री, CM सुरक्षाअधिकाऱ्याच्या मुलीलाही सोडले नाही, मनुष्य तस्करीचा असा लागला छडा

रेल्वे स्थानक आणि बस स्थानकात एकट्या असणाऱ्या मुलींना ते हेरायचे आणि आपल्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर या मुलींना लग्नासाठी किंवा गैरकामासाठी विकायचे...

टार्गेटवर एकट्या असणाऱ्या मुली,15 मुलींची विक्री, CM सुरक्षाअधिकाऱ्याच्या मुलीलाही सोडले नाही, मनुष्य तस्करीचा असा लागला छडा
| Updated on: Jul 11, 2025 | 5:31 PM

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील कृष्णानगरात पोलिसांनी मनुष्य तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे.पोलिसांनी मनुष्य तस्करीतील दोन आरोपींना अटक केली आहे. त्यातील मध्य प्रदेशातील सहडोल येथून संतोष साहू आणि राजस्थानच्या साकेतनगरातील रहिवासी मनीष भंडारी याला अटक केली आहे.या टोळीने गेल्या १२ वर्षांपासून लग्नासाठी आणि अनैतिक कामांसाठी मुलींची विक्री केली आहे.या टोळीच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली असून त्यातील एक रायबरेलीची राहणारी आहे.

ही टोळी एकट्या आणि घरातून पळून आलेल्या मुलींनी टार्गेट करायचे. चारबाग रेल्वे स्थानक आणि आलमबाग बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणांवर एकट्या मुलींवर नजर ठेवायचे. संतोष साहू हा टोळीचा प्रमुख आहे.पोलिसांना सुगावा लागताच तो त्याचा मोबाईल बदलायचा. चौकशीत त्याने १२ वर्षांत १५ हून अधिक मुलींची विक्री केली आहे.एका मुलीला लग्न आणि अनैतिक कामासाठी ५० हजार पासून २.७५ लाख रुपयात विकली जायचे अशी माहीती डीसीपी दक्षिण निपुण अग्रवाल यांनी दिली आहे.
सीएमचे पीएसओ यांच्या मुलीच्या तपासात उलगडले

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या खाजगी सुरक्षा अधिकारी ( पीएसओ ) यांची १६ वर्षांची मुलगी २८ जूनला घरातून गायब झाली होती. तिने तिच्या वडीलांना व्हॉईस मॅसेज पाठवला होता. त्यात तिने पापा मला शोधू नका, मी देवाजवळ जात आहे. किशोरी घरात जाताना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती देखील सोबत घेऊन गेली होती. ती हरवल्याची तक्रार ३० जून रोजी कृष्णानगर पोलिस ठाण्यात दाखल झाली.चौकशीत असे कळले की तिला मथुरा येथील प्रेमानंद महाराजांना भेटायची इच्छा होती. संतोष याने तिच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेऊन तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि चारबाग रेल्वे स्थानकात बोलावले. त्यानंतर त्याने मथुरेला जायचे सांगून तिला कानपूर नंतर प्रयागराज येतील त्याच्या घरी नेले.तेथे त्याने किशोरी हिला मनीष भंडारी याला ५० हजारात विकले. परंतू ती रडू लागल्याने पकडले जाण्याच्या भीतीने त्याने तिला पुन्हा संतोषलाकडे सोपवले आणि त्याचे ४५ हजार परत घेतले.

पोलिसांना सहा पथके स्थापून किशोरीचा शोध सुरु केला. ८ जुलैला तिला शोधून काढले.तिने दिलेल्या कबुली जबाबानुसार संतोष आणि मनीष यांना अटक करण्यात आले. संतोषकडून रायबरेलीतून आणखी मुलीची सुटका केली. तिच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे.

राजस्थानात सर्वाधिक मुलींची विक्री

या टोळीचे नेटवर्क उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि राजस्थानात पसरलेले आहे. सर्वात जास्त मुलींची विक्री राजस्थानात झाली आहे. येथे एका मुलीला २.७५ लाखांना विकण्यात आले होते. संतोष ज्यांना लग्नाकरीता मुलगी विकत घ्यायची त्यांना हेरायचा. जे लाखो रुपये मोजायला तयार असायचे. संतोषवर लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, छत्तीसगड आणि प्रतापगड येथे सहा एफआयआर दाखल आहेत. संतोष केवळ तिसरी शिकलेला आहे. मनीष आठवी पर्यंत शिकलेला आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये गाडीही चालवतो. दोन्ही आरोपींनी आधी जेलवारीही केली आहे.संतोषवर २५ हजाराचे इनामही जाहीर केले होते.