AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री 3 वाजता सगळे गाढ झोपेत, बसमध्ये तेव्हा अचानक अघटित घडलं… क्षणात माजला गोंधळ, तिथे काय घडलं ?

उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर पहाटे एका डबल डेकर एसी स्लीपर बसला भीषण आग लागली. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्वरित बसमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेने बस सुरक्षा नियमांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मध्यरात्री 3 वाजता सगळे गाढ झोपेत, बसमध्ये तेव्हा अचानक अघटित घडलं... क्षणात माजला गोंधळ, तिथे काय घडलं ?
त्या बसमध्ये काय घडलं ?
| Updated on: Jul 25, 2026 | 4:08 PM
Share

मध्यरात्रीची वेळ.. गंगा एक्सप्रेसवेवर एक डबल डेकर एसी स्लीपर बस भरधाव वेगाने धावत होती. बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. पण अचानक बसच्या आत धूर पसरू लागला. काही क्षणांतच झोपेचं वातावरण घबराटीत बदललं. प्रवासी जागे झाले, कुणी मुलांना उचललं, तर कुणी सामानाची पर्वा न करता जीव वाचवण्यासाठी बसबाहेर धाव घेतली. आणि पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भयंकर विळख्यात सापडली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर घडली. दिल्लीहून सिद्धार्थनगरकडे निघालेल्या एसी स्लीपर डबल डेकर बसला पहाटे भीषण आग लागली. सुदैवाची बाब म्हणजे बसमधील सर्व 15 प्रवाशांनी वेळेवर बाहेर पडत आपला जीव वाचवला. हा प्रकार बहादूरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडला. यामुळे मोठी खळबळ माजली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, बस रस्त्यावर वेगाने असतानाच एसी यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर बसमध्ये धूर पसरला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला कवेत घेतले. मात्र प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने बसमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच सर्वजण सुरक्षित बाहेर आले. थोडासा जरी उशीर झाला असता, तर हा अपघात मोठ्या जीवितहानीत बदलला असता.

पोलिस आणि फायर ब्रिगेडने सांभाळला मोर्चा

बसला लागलेल्या या आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत डबल डेकर बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. पोलीसांनी बस चालक शिवकुमार (रा. बस्ती) आणि प्रवाशांचे जबाब नोंदवले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

सध्या एसीमधील शॉर्ट सर्किट हे आगीमागील प्राथमिक कारण मानले जात आहे. मात्र, तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीसांनी सांगितले आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष तपास अहवालानंतरच समोर येणार आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत धावत्या बसांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बसांची फिटनेस तपासणी वेळेवर केली जाते का? इलेक्ट्रिकल यंत्रणेची नियमित देखभाल केली जाते का? आणि विशेषतः लांब पल्ल्याच्या रात्रीच्या बससेवांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता संबंधित यंत्रणांना द्यावी लागणार आहेत.

Follow Us
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी;
LIVE Vote Counting of MLC Election Results 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांची उद्या मतमोजणी; LIVE अपडेट्स एका क्लिकवर!
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत,
मुंबईकरांचा लोकल प्रवास रखडला! मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत, कारण...