आता 25 दिवसांनी करता येणार गॅस बुकिंग, 45 दिवसांचा नियम रद्द, सरकारचा नवा आदेश समजून घ्या? वाचा काय बदललं?

घरगुती गॅस सिलिंडरचे रिफील बुकींग करण्याच्या नियमात आता सरकारने बदल केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता 25 दिवसांनी करता येणार गॅस बुकिंग, 45 दिवसांचा नियम रद्द, सरकारचा नवा आदेश समजून घ्या? वाचा काय बदललं?
LPG REFILL BOOKING RULE
| Updated on: Sep 07, 2026 | 6:39 PM

मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थितीमुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये मंत्रालयाने १२ मार्च २०२६ रोजी एलपीजीचा तुटवडा आणि वाढती मागणी पाहून दोन एलपीजी सिलिंडरमधील बुकींगचे अंतर शहरी भागात २५ दिवसांचे तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचे केले होते. आता एलपीजी पुरवठ्याची स्थिती पाहून गॅस सिलिंडर रिफीलचे बुकींग आता ग्रामीण भागासह सर्वच घरगुती सिलिंडर ग्राहकांसाठी २५ दिवसांचे करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामीण असो की शहरी सर्वच भागात दोन सिलिंडर मधील बुकींगची वेळ २५ दिवसांची करण्यात आली आहे.

LPG बुकिंगच्या नियमात मोठा बदल झाला आहे. दोन गॅस सिलिंडर रीफिलमधील बुकिंगचे अंतर आता २५ दिवसांवर केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी (LPG) रीफिल बुकिंगच्या नियमात सुधारणा करीत आता दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर ग्रामीण भागात ४५ दिवसांवरून घटवून २५ दिवस केले आहे.शहरी भागात हे अंतर आधीच २५ दिवसांचेच होते.

राज्याच्या ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दोन सिलिंडरमधील बुकींगची वेळ मर्यादा ४५ दिवसांची केल्याने त्यांना गॅस सिलिंडर संपल्यास चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. त्यामुळे आता दोन सिलिंडरमधील बुकींगचे अंतर २५ दिवसांचे केल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात दिलासा मिळाला आहे.

Gas cylinder refill booking now possible after 25 days

नवीन निर्णयानुसार आता ग्रामीण आणि शहरी अशा सर्व प्रकारच्या घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी २५ दिवसांचा एकसमान बुकिंग नियम करण्यात आला आहे. सुधारित नियमानुसार, आता कोणताही ग्राहक पहिला सिलिंडर बुक केल्यानंतर किमान २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर पुढील सिलिंडर बुक करू शकणार आहे. त्यामुळे सिलिंडर अभावी होणारी गैरसोय दूर होणार आहे. इराण – अमेरिका- इस्रायल युद्धानंतर देशातील एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंटर-रीफिल बुकिंग गॅप कमी करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us