तात्काळ पहलगामला जा… नरेंद्र मोदी यांची अमित शाह यांच्याशी चर्चा; हाय लेव्हल मिटिंग सुरू

या उन्हाळ्याच्या हंगामातील खोऱ्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणाक कश्मीरमध्ये असताना पर्यटकांना लक्ष्य करुन जम्मू-कश्मीर येथील पर्यटकांनी येऊ नये त्यांच्या दहशत पसरवावी यासाठी या हल्ला झाल्याचे म्हटले आहे.

तात्काळ पहलगामला जा... नरेंद्र मोदी यांची अमित शाह यांच्याशी चर्चा; हाय लेव्हल मिटिंग सुरू
| Updated on: Apr 22, 2025 | 7:23 PM

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-कश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारच्या सकाळी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर पर्यटक फिरत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या अमानुष गोळीबारात 20 पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य डझनभर पर्यटक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान सौदी अरबच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला झाल्याने त्यांनी जातीने फोन करुन घडलेल्या घटनेचा आढावा घेताला आहे आणि गृहमंत्री अमित शाह यांना निकडची सर्व पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

येथे पाहा ट्वीट –

पीएम नरेंद्र मोदी यावेळी सौदी अरबच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन लावला आणि तातडीने पहलगामला जाण्याचे आदेश दिले आहेत. सध्या अमित शाह आयबी प्रमुख,जम्मू – कश्मीरचे डीजी आणि सैन्य दल आणि सीआरपीएफच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत एक उच्च स्तरीय बैठक घेत आहेत. जम्मू कश्मीरचे सीएम उमर अब्दुल्ला देखील या घटनेनंतर खूप काळजीत असून तातडीने पहलगामला रवाना झाले आहेत.

उच्च स्तरीय बैठक सुरु

गृहमंत्री अमित शाह यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एक उच्च स्तरीय बैठक बोलावली आली आहे. या बैठकीत सैन्य दल, सीआरपीफ आणि जम्मू कश्मीर पोलीस अधिकाऱ्यांसह जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल व्ही. के. सिन्हा या व्हिडीओ कॉन्फरन्सिगं बैठकीला हजर होते. गुप्तचर विभागाच्या मिळालेल्या खबरीनुसार अतिरेकी टुरिस्टच्या मोठा ग्रुपला टार्गेट करणार होते. घटनास्थळी अचानक गोळीबार करून अतिरेकी पसार झाले. अत्यंत नियोजित पणे पर्यटकांना टार्गेट करण्यात आले आहे.