भारतातील अशी नदीच्या जिच्या पाण्यात सोन्याचे कण सापडतात, कुठे आहे नेमकी ?
नद्यांना जीवनवाहिनी म्हटले जाते. अनेक प्राचनी संस्कृती नद्यांच्या किनारी वसलेल्या आहेत. भारतात गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी अनेक संस्कृती उदयास आल्या आहेत. परंतू एका नदीतून चक्क सोने सापडते.

भारतात एक अशी नदी आहे जिच्या पाण्यातून सोन्याचे कण निघतात असे म्हटले जाते. या नदीचे नाव म्हणूनच स्वर्णरेखा ( सुवर्णरेखा ) असे ठेवण्यात आले आहे. ही नदी झारखंडची राजधानी रांची जवळील नगरी गावातील रानी चुआं येथून वाहते. या नदीची लांबी सुमारे ३३९५ ते ४७४ किलोमीटर दरम्यान आहे. ही नदी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओरिसा असा प्रवास करत अखेर बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.
नदीचे नाव स्वर्णरेखा का पडले ?
या नदीचे नाव स्वर्णरेखा म्हणजे सोन्याची रेषा असे पडले आहे. हे नाव देण्यामागे एक कारण म्हणजे या नदीच्या वाळूत आजही सोन्याचे सूक्ष्म कण आढळतात. झारखंड येथील अनेक ग्रामीण आणि आदिवासी कुटुंबे या नदीची वाळू गाळून सोन्याचे कण जमा करतात आणि आपली उपजिविका चालवतात. त्यामुळे ही नदी अनेक कुटुंबाचे रोजगाराचे साधन बनली आहे. या नदीत रोज शेकडो लोक सोने मिळेल या आशेने वाळू गाळत असतात.
नदीच्या पाण्यात सोन्याचे कण
नदीचे पाणी गाळून काही लोकांना सोने मिळते. ते सोने काही अशा तुकड्यात मिळत नाही की ज्याला विकून हजारो वा लाखो रुपयांची कमाई होईल. ते केवळ सोन्याचे कण असतात, त्यामुळे काही रुपये त्यांना मिळतात. या नदीचा केवळ एक हिस्सा असा आहे जेथे लोकांना सोन्याचे कण मिळतात. हा भाग जमशेदपूर पासून सुमारे १७ किलोमीटर दूर शेजारील जिल्हा सरायकेला-खरसावांच्या चांडिल ब्लॉकमध्ये स्वर्णरेखा नदीच्या किनारी वसला आहे.
आजच नाही, खूप काळापासून नदीच्या किनारी वसलेल्या गावातील लोक नदीत वाहून आलेल्या वाळू आणि मातीत सोन्याचे कण जमा करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्यासाठी हे सोन्याचे कण म्हणजे उपजिविकेचे साधन आहे. या सोन्याच्या कणामुळे त्यांचे कुटुंब पोसले जाते. परंतू नदीच्या मातीतून सोन्याचे कण काढणे खूपच अवघड काम आहे. सुवर्णरेखाच्या सोन्याच्या चमके मागे अत्यंत शारीरिक कष्ट आणि दर्दनाक कष्ट लपलेले आहेत. कारण सोने शोधण्याचे काम जितके सोपे वाटते तितके ते प्रत्यक्षात नाही.
नदीच्या पाण्यात सोने कसे मिळते
स्वर्णरेखा नदी जेथून वाहत येते, तेथील जमीनीत सोन्याचे प्रमाण उपलब्ध आहे. या पर्वतमय भागातून धूप होऊन निघालेल्या मातीत सोन्याचे कण असल्याने या नदीत सोन्याचे कण सापडतात. हे कण नदीच्या किनारी भागात सापडतात. या प्लेसर डिपॉझिट म्हटले जाते. या प्रक्रियेत मिळालेले सोने एकदम शुद्ध अवस्थेत असते. मात्र, पाण्यातून वाहात येताना याचे प्रमाण कमी होते. सोने कधी मिळते कधी मिळत नाही. तरीही लोक दिवसभर मेहनत घेतात.
सुमारे २० किमीच्या परीघात पसरलेल्या डझनावारी गावातील शेकडो गावकरी एक साथ सोने शोधतात. हे लोक एकमेकांचा केवळ आदरच करत नाहीत तर सोने शोधण्यात एकमेकांना मदत करतात. सोन्याची जागा कशी ओळखतात या प्रश्नाला उत्तर देताना एका गावकऱ्याने म्हटले की आधी त्या जागेची निवड करतात जेथे पाण्याच्या सोबत दगड आणि माती वाहून किनारी भागात जमा होते.
सोने शोधणे सोपे काम नाही
गावकरी आधी दगड हटवतात.नंतर वाळूचे थर खोदून मातीचा थर शोधतात. माती एका भांड्यात घेऊन हळूहळू धुतली जाते. माती पाण्याने वाहून जाते, तर सोने भांड्यात तळाला जमते. गावकरी सोन्याचे कण पाण्याच्या सहाय्याने एल्युमिनियमच्या वाटीत ठेवतात आणि उन्हात सुखवतात. वाटीतील पाणी सुखल्यानंतर सोने दिसते.हे सोन्याचे कण कागदात सांभाळून ठेवले जाते. कडक उन्हात वा थंडीत नदीच्या किनारी गुडघ्यावर बसून वाकून तासन तास माती पासून सोने वेगळे करणे अवघड काम असते. खूप प्रयत्न केल्यानंतर एक दोन कण सोने सापडतात. नदीत काही वेळा अनेक तास मेहनत केल्यानंतरही काहीच सापडत नाही. परंतू पुन्हा नव्या उमेदीने लोक सोने शोधण्यासाठी नदीत उतरतात.