मोठी बातमी! भारतानं करून दाखवलं, अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, ट्रम्प यांची झोप उडाली, मोठी गुड न्यूज

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर आता भारतानं मोठं पाऊल उचललं असून, आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका अमेरिकेला बसला आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! भारतानं करून दाखवलं, अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, ट्रम्प यांची झोप उडाली, मोठी गुड न्यूज
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2025 | 8:52 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आला. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो आणि तो पैसा रशिया युद्ध फंड म्हणून युक्रेनविरोधात वापरतो असा ट्रम्प यांचा आरोप आहे. दरम्यान अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारतातील निर्यातदारांची चिंता वाढली आहे. मात्र आता त्याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे, भारतीय निर्यातदारांनी आपला माल आता अमेरिकन बाजारपेठेऐवजी चीनच्या बाजारपेठांकडे वळवला आहे. यावर बोलताना चीनचे राजदूत शू फीहोंग म्हणाले की आम्ही चीनच्या बाजारपेठेंमध्ये भारतीय वस्तूंचं स्वागत करतो, आम्ही भारताची मदत करण्यासाठी सदैव तयार आहोत.

आम्ही भारताची पूर्णपणे मदत करू जेणे करून भारतावरील अमेरिकेच्या टॅरिफचा प्रभाव कमी होईल, असंही यावेळी चीनच्या राजदूतांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 202526 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातच भारताची चीनसोबतची निर्यात तब्बल 22 टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसरीकडे मात्र अमेरिकेसोबतची भारताची निर्यात घसरली आहे.

सरकारी आकड्यांनुसार भारतानं 2025 च्या एप्रिलपासून ते सप्टेंबरपर्यंत चीनला तब्बल 8.41 अब्ज डॉलरचं सामान निर्यात केलं आहे. तर गेल्या वर्षी याच काळातील निर्यात ही 6.90 अब्ज डॉलर इतकी होती, याचाच अर्थ भारताच्या चीनसोबतच्या निर्यातीमध्ये तब्बल 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं ऑगस्ट महिन्यात भारतावर टॅरिफ लावला आहे, तेव्हापासून ते आतापर्यंत ही निर्यात तब्बल 34 टक्क्यांनी वाढली आहे. भारताकडून चीनला होणारी निर्यात 1.09 अब्ज डॉलरवरून 1.47 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

कोणत्या वस्तूंची निर्यात?

भारतामधून सध्या चीनला मोठ्या प्रमाणात तेल आणि पेट्रोलियम उत्पादनाची निर्यात केली जात आहे. तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीमध्ये गेल्या काही महिन्यात तब्बल 116 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सोबतच टेलीफोनच्या सेट आणि विविध पार्ट्स, झिंगा या सारख्या गोष्टी भारत चीनला निर्यात करतो.