पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…

S-400 Defense System : रशियाने भारताकडे चौथी S-400 हवाई संरक्षण प्रणाली रवाना केली असून, ती मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400...
S 400 System
Image Credit source: Google
| Updated on: Apr 28, 2026 | 2:38 PM

गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच भारताला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमने दणका दिला होता. भारताच्या S-400 समोर पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अगदी निष्प्रभ ठरले होते. अशातच आता याच S-400 डिफेन्स सिस्टमबाबत मोठी अपडेट समोर आले आहे. भारताला आता काही दिवसांत S-400 ची नवी खेप मिळणार आहे. रशियाने भारतासाठी चौथी S-400 एअर डिफेन्स सिस्टम रवाना केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली तैनात होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताची सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे.

हिदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार रशियाने चौथी S-400 प्रणाली भारताकडे पाठवली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही सिस्टम भारतीय बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाचवी S-400 प्रणाली यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान याच S-400 ने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिच्यासमोर शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांच्या सर्व योजना फसल्या होत्या. आता आणखी प्रणाली भारतात दाखल होत असल्याने भारताची ताकद आणखी वाढली आहे.

पाच S-400 चा करार

मोदी सरकारने आधीच आणखी पाच S-400 एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे. या प्रणालींमध्ये पाकिस्तानमधील कोणतेही हवाई लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. याची मारक क्षमता सुमारे 400 किलोमीटरपर्यंत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताने 2018 मध्ये रशियासोबत पाच S-400 लाँग-रेंज सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टमसाठी 5.5 अब्ज डॉलरचा करार केला होता. सध्या भारताकडे तीन S-400 प्रणाली कार्यरत आहेत. उर्वरित लवकरच भारतात दाखल होणार आहे.

नवीन S-400 भारताकडे रवाना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात येत असलेल्या S-400 प्रणालीची तपासणी पूर्ण झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी 18 एप्रिलपूर्वीच तिचे निरीक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ही प्रणाली भारताकडे रवाना करण्यात आली आहे. ही नवीन S-400 प्रणाली राजस्थानमध्ये तैनात केली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या प्रणालीसमोर F-35 आणि F-16 सारखी लढाऊ विमानेही फेल ठरतात. भारतात सध्या 3 S-400 प्रणाली आहेत. या पंजाब, लडाख आणि सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत.

 

Follow Us