सरकारचा सर्वात मोठा निर्णय, मॉर्फ फोटो, व्हिडीओ अपलोड केले तर…आला 2 तासांचा महत्त्वाचा नियम!

गेल्या काही दिवसांपासून डीपफेक आणि एआय जनरेटेड कंन्टेंटचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारचे कन्टेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. विशेषत: महिलांचे डिपफेक, एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे.

सरकारचा सर्वात मोठा निर्णय, मॉर्फ फोटो, व्हिडीओ अपलोड केले तर...आला 2 तासांचा महत्त्वाचा नियम!
social media platform
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2026 | 6:45 PM

New IT Rule : सरकारने आयटी नियमांमध्ये पुन्हा एकदा मोठे बदल केले आहेत. आता सोशल मीडियावर विनापरवानगी व्हायरल झालेला किंवा व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ किंवा फोटो दोन तासांच्या आत डिलीट करणे बंंधनकारक असणार आहे. हे फोटो हटवण्यासाठी आता अनेक दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुसरीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सरकारने नेमका काय निर्णय घेतला?

गेल्या काही दिवसांपासून डीपफेक आणि एआय जनरेटेड कंन्टेंटचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारचे कन्टेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. विशेषत: महिलांचे डिपफेक, एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे. असे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल करून महिलांना ब्लॅकमेल केले जात असल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याचा वाईट परिणाम म्हणून महिलांना ट्रोलिंग आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने IT Rules 2026 मध्ये बदल केले आहे. आता नवे आयटी नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार कोणताही युजर समोरच्या व्यक्तीची परवानगी न घेता इंटिमेट दृश्य, फोटो किंवा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असेल तर संबंधित पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर ते कन्टेंट लगेच हटवले जाणार आहे.

अगोदर मर्यादा 24 तासांची परंतु आता…

अवघ्या दोन तासांच्या आत हे कन्टेंट हटवण्यात यावे, असे या नव्या नियमात नमूद आहे. शासकीय किंवा न्यायालयीन आदेशांच्या बाबतीत कन्टेंट हटवण्याची ही मर्यादा 3 तास करण्यात आली आहे. याआधी आक्षेपार्ह कन्टेंट हटवण्याची मर्यादा ही 24 तासांची होती. परंतु आता हे कन्टेंट 2 तासांच्या आत हटवण्यासाठी फास्ट मॉडरेशन टूल, एआय डिटेक्शन टूल तयार करावे. इमर्जन्सी रिस्पॉर्न्स टीमचीही स्थापना करावी, असेही सांगण्यात आले आहे. नव्या नियमांत एआय कन्टेंटबाबतही नियम कडक करण्यात आले आहेत. एखादे कन्टेंट एआय असेल तर तसे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता डिपफेक आणि मॉर्फ कन्टेंटवर आळा बसेल, असे सांगितले जात आहे.

Follow Us