मोठी बातमी! सरकारने मागितला 2 वाजेपर्यंत वेळ, बैठकीत काय घडलं?
कॉकरोज जनता पार्टी आणि सरकार यांच्यात बैठक झाली. कॉकरोज जनता पार्टीच्या 3 मागण्यांपैकी 2 मागण्या सरकारने मान्य केल्या. दोन वाजेपर्यंत आता वेळ सरकारने शिष्टमंडळाकडे मागितला आहे.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन पेटले आहे. जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. या आंदोलनाची धग पार देशभरात पोहोचली. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात नुकताच बैठक पार पडली. सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर बाहेर आल्यावर साैरभ दास यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तडजोड होणार नाही. आम्ही त्यांना बैठकीत स्पष्ट सांगितले. 3 पैकी 2 मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ मागितली आहे. पुन्हा एकदा सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीची बैठक होणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमची सर्वात महत्वाची मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्या 2 वाजेपर्यंत सरकार निर्णय घेईल. 1 तास सरकार आणि कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. सरकारकडून तात्काळ 3 पैकी 2 मागण्या मान्य केल्या. त्यामध्येच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर 2 पर्यंत वेळ सरकारने मागितला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, असे स्पष्ट शब्दात साैरभ दास यांनी म्हटले. कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आमच्या मागणीबाबत सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार त्यांना लवकरच पदावरून दूर करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
सरकारने दोन मागण्यांना मंजुरी दिली आहे. नुकसानभरपाई देणे आणि विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले 11 एफआयआर व कायदेशीर खटले मागे घेणे, हे त्यांनी मान्य केले. आता धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सरकारने आंदोलकांच्य दोन मागण्या पूर्ण केल्या. मात्र, अजूनही 1 मोठी आणि महत्नाची मागणी तशीच आहे. आता उद्या यावर फैसला होणार हे स्पष्ट आहे.