नव्या वर्षात नवे कर: ओला-उबर राईडवर जीएसटी, बूट महागणार!

| Updated on: Dec 28, 2021 | 10:21 PM

जीएसटी परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत वर्तमान कर संरचनेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रेडिमेड कपडे आणि बूटांवर जीएसटी वाढविण्यात आला आहे. नव्या संरचनेसह 5 टक्क्यांऐवजी 12 टक्के जीएसटी आकारणी केली जाईल. आॕनलाईन फूड डिलिव्हरीत रेस्टॉरंट ऐवजी डिलिव्हरी सर्व्हिस पुरवठादाराकडून कर वसुली केली जाईल.

नव्या वर्षात नवे कर: ओला-उबर राईडवर जीएसटी, बूट महागणार!
ओलाचं नवीन फीचर; ड्रायव्हरसाठी ‘हे’ अनिवार्य
Follow us on

नवी दिल्ली- नव्या वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. नव्या वर्षापासून विविध सुविधा आणि सेवांवर अधिक कर आकारला जाण्याची शक्यता आहे. तसेच कर चौकटीत नव्या वस्तू व सेवांचा समावेश होण्याची शक्यता आहे. ओला व उबेर सारख्या अॕप आधारित कॕब सेवांच्या वापरावर जीएसटी आकारला जाणार आहे.

वर्ष नवं, कर पर्व नवं:

जीएसटी परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत वर्तमान कर संरचनेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रेडिमेड कपडे आणि बूटांवर जीएसटी वाढविण्यात आला आहे. नव्या संरचनेसह 5 टक्क्यांऐवजी 12 टक्के जीएसटी आकारणी केली जाईल. आॕनलाईन फूड डिलिव्हरीत रेस्टॉरंट ऐवजी डिलिव्हरी सर्व्हिस पुरवठादाराकडून कर वसुली केली जाईल. अॕप आधारित कॕब सर्व्हिस बुकिंग सेवेवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तज्ज्ञांचं मत:

आतापर्यंत रेडिओ टॕक्सीवर जीएसटीची आकारणी केली जात होती. मीटर आणि जीपीएस आधारित टॕक्सी सेवेचा यामध्ये समावेश होता.मात्र, अॕप द्वारे बुकिंग केलेल्या ओला व कॕबला जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आले होते.

आॕनलाईन ‘येस’; आॕफलाईन ‘नो’:

जीएसटी परिषदेच्या सुधारित कररचनेचा सर्वसाधारण भाडोत्री रिक्षा व गाड्यांवर परिणाम होणार नाही. अद्यापही जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. केंद्र सरकार अॕपद्वारे बुकिंग करण्यात येणाऱ्या कॉम्पुटर्सला प्रीमियम श्रेणीत गणते. त्यामुळे अॕप आधारित टॕक्सी सोबत रिक्षाला जीएसटीच्या कक्षेत आणले जाणार आहे.

चालकांच्या मनमानीत वाढ:

केंद्र सरकारच्या निर्णयाचा सामान्य नागरिकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. कॉम्पुटर आॕटो चालकांची मनमानी टाळण्यासाठी आॕनलाईन बुकिंगला पसंती दर्शवितात. मात्र, सुविधेचा वापर पाच टक्क्यांनी महागला आहे. आॕनलाईन कॕब बुकिंग महागल्याने आॕफलाईन टॕक्सीकडे नागरिकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे. आॕफलाईन कॕब चालकांद्वारे अधिक पैशांची मागणी करुन प्रवाशांना कोंडीत पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.